घरलाईफस्टाईलआरोग्यदायी 'खजूर'

आरोग्यदायी ‘खजूर’

Subscribe

बाराही महिने बाजारात खजूर आढळतो. खजूर उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हा गुणकारी खजूर दररोज खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया खजूराचे आरोग्यदायी फायदे.

पौष्टिक खजूर खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. गोड आणि स्वादिष्ट खजूर खाल्ल्याने आपल्या शरिराला नेमके कोणते फायदे होतात जे जाणून घेऊया.

  • खजूरामध्ये अधिक प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते. तसेच खजूर हिमोग्लोबिनची कमतरता भरुन काढते त्खयामुळे खजूराचे सेवन अतिशलय उपयुक्त ठरते.
  • सध्याच्या धकाधकीच्या जीवनात थकवा हा सर्रास येतो. हा थकवा दूर करण्यासाठी खजूराचे सेवन करावे. खजूरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लूकोजचे प्रमाण असते. यामुळे दररोज सकाळी दोन ते तीन खजूर खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.
  • ह्यदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास खजूर फायदेशीर ठरतो. याकरतचा नियमित खजूराचे सेवन करावे.
    benefits of healthy dates
  • चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यासाठी खजूर फायदेशीर ठरतो. खजूर खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा देखील उजळतो. त्यामुळे दररोज दोन खजूर खाल्ल्याने तरुण राहण्यास मदत होते.
  • खजूरामध्ये विटामिन आणि प्रोटीन अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे बारीक असलेल्या व्यक्तीने रोज रात्री पाण्घायात खजूर भिजत घालून त्तयाचे सकाळी सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. खजूरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
  • खजूर हा विटामीन ‘ए’ चा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे खजूर खाल्ल्याने दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. त्याचबरोबर खजूर आतडे, स्तन आणि फुफ्फुसांचा कर्करोगापासून बचाव करतात.
  • तुम्हाला अर्धांगवायूचा त्रास असल्यास खजूर खाणे लाभदायी ठरते. दररोज एक खजूर खाल्ल्याने आराम मिळतो.
  • सर्दीचा त्रास झाला असल्यास एक ग्लास दूधामध्ये चार ते पाच खजूर, एक वेलची आणि एक ते दोन काळीमिरी टाकून ते दूध उकळून ते दूध प्यायल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -