फॅशन विश्वात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची पुन्हा चलती

या ज्वेलरीमुळे फक्त सौंदर्यच नाही मॉर्डन लूक खुलवण्यात देखील मदत होते. त्यामुळे फॅशन विश्वात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चर्चा असून त्याचीच चलती

Mumbai

गेल्या काही दिवसांपूर्वी महिलावर्गाची ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला पसंती मिळताना दिसत होती. मात्र या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा पुन्हा ट्रेंड आल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही ड्रेसिंग स्टाईलवर साजेशा दिसणाऱ्या या ज्वेलरीची मागणी बाजारपेठेत पुन्हा होताना दिसत आहे. यापुर्वी फक्त सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांचा वापर होत होता. मात्र आता ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला प्रचंड मागणी आहे. या ज्वेलरीमुळे फक्त सौंदर्यच नाही मॉर्डन लूक खुलवण्यात देखील मदत होते. त्यामुळे फॅशन विश्वात ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चर्चा असून त्याचीच चलती आहे.

स्टर्लिंग चांदीपासून ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी तयार केल्याने ही ज्वेलरी घातल्याने सिंपल-सोबर लूक मिळतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा रंग थोडासा काळपट असल्याने अधिक काळ हे दागिने वापरता येतात परंतु या दागिन्यांमुळे तरूणींना क्लासी लूक देखील मिळतो. या दागिन्यांचा रंग चांदीसारखा मात्र थोडा काळपट असल्याने त्यांचा सहसा रंग आणि चमक जात नाही. याच कारणांमुळे मुलींमध्ये ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला पसंती मिळत आहे.

या ज्वेलरीला असलेला काळपट रंग सल्फरसोबत एकत्र येऊन सिल्वर सल्फाइड तयार झाल्याने येतो. हे दागिने रोज कॉलेज, ऑफिसला जाताना आपल्याला वापरता येतात. हे दागिने भारतीय ते पाश्चात्य कपड्यांसह परिधान केले जाऊ शकतात. जसे की, शर्ट, डेनिम आणि साध्या सलवार कुर्त्यावर देखील ही ज्वेलरी घालता येऊ शकतात. रोजच्या ड्रेसिंग स्टाईलसोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा वापर करू चारचौघात उठून दिसाल हे मात्र नक्की…

या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीमध्ये झुमके, लांब कानातले, कॉकटेल रिंग्स, गळ्यातील चैन, शॉर्ट नेकलेस, बँगल्स, नोज पिन्स आणि इयर पिन्स अशा दागिन्यांचा पुन्हा ट्रेंड आल्याने या दागिन्याची मोठी चलती बाजारपेठेत सध्या आहे.