घरलाईफस्टाईलकेसांसाठी कांद्याचा असा करा वापर!

केसांसाठी कांद्याचा असा करा वापर!

Subscribe

कांद्याची टेस्ट भलेही आपल्या जिभेला आवडत नसेल, पण केसांना कांद्याची टेस्ट फार आवडते. याचं कारण म्हणजे कांद्यात सल्फर भरपूर प्रमाणात असतं. सल्फरमुळे डोक्याच्या त्वचेत रक्त पुरवठा वाढतो, ज्याने केसांची वाढ अधिक वेगाने होते.

कांदा हा खाद्य पदार्थांची चव वाढवण्यासोबतच सौंदर्य खुलवण्यास देखील मदत करतो. खासकरून तुम्हाला लांब केस हवे असतील तर कांदा अधिक फायदेशीर आणि नैसर्गिक उपाय ठरतो. यामुळे तुमचे केस चांगले राहण्यास मदत होईल त्यासोबतच कोणते साइड इफेक्ट्सही होणार नाहीत. चला जाणून घेऊ कांद्याचा केसांवर कसा करायचा वापर.

दूर होतील डॅंड्रफ आणि इन्फेक्शन

- Advertisement -

कांद्यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल तत्व असतात. केसांमधून डॅंड्रफ आणि कोणत्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन दूर करतात. याने अर्थातच केसांची वाढ होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

तुटणार नाहीत केस

कांद्याच्या रसाने कोलेजनचं प्रमाण वाढतं. याने केस पातळ होत नाही आणि केस तुटतही नाहीत. याने आपल्या हेल्दी आणि चमकदार केस मिळतात.

कसा वापराल कांदा

सर्वातआधी एका कांद्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून त्यात थोडं खोबऱ्याचं तेल टाका. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळातसहीत केसांना लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. लवकरच तुम्हाला फरक दिसू लागले.

कांद्याची पेस्ट

कांद्याची पेस्ट तयार करून त्यात ऑलिव्ह ऑइल मिश्रित करा. ही पेस्ट केसांना आणि ३० मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे. हा उपाय नियमित केल्याने दोन महिन्यात तुम्हाला फरक दिसू लागेल.

अशी सुटेल समस्या

कुरळ्या केसांसोबत समस्या असते की, कांद्यांची पेस्ट लावल्यावर कांद्याचे बारीक कण केसांमध्ये अडकून राहतात. ही समस्या दूर करण्यासाठी कांद्याची पेस्ट स्वच्छ कॉटनच्या कापडातून गाळून घ्या. नंतर केसांना लावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -