दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

health benefits eating rice curd
दही-भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Advertisement

आपल्याला आई लहानपणापासून दूध-भात भरवत असते. अनेकांना दूध-भात हा प्रकार प्रचंड आवडतो. त्याचप्रमाणे दही-भात हा प्रकार देखील अनेकांना खूप आवडतो. दही-भात म्हटलं तर चटकन आठवण येते ती अनंत चतुर्थीची. कारण गणपती विसर्जनाच्या वेळी प्रसाद म्हणून दही-भात दिला जातो. दही-भात खाण्याचे आरोग्यदायी अनेक फायदे आहे. तेच आज आपण पाहणार आहे.

दही-भात खाण्याचे फायदे

शरीराचे तापमान कमी होते

दक्षिण भारतात दही-भात जास्त प्रमाणात का खातात हे तुम्हाला माहीत आहे का? कारण तिथे वर्षभर उष्ण वातावरण असते. अशा वातावरणात दही-भात शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो. गरम जेवणानंतर दही-भात खाल्ल्याने थंड वाटते.

प्रोटीन अधिक प्रमाणात मिळतात

दह्यात कॅल्शिअमप्रमाणे प्रोटीनचे प्रमाणात अधिक असते. दही एक चांगले अँटीऑक्सीडेंटही आहे. म्हणून दही-भात एकत्र खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

तणाव दूर होतो

दही तुमचा तणाव दूर करते. दह्यामधील असलेले प्रोबायोटिक बँक्टेरिया तुमचा तणाव दूर करण्यास मदत करते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

वजन घटवण्यास मदत होते

दही-भात एकत्र खाल्ल्याने वजन घटवण्यास मदत होते. दही-भात एकत्र खाल्ल्याने तुम्हाला एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. यामध्ये कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्तपणे खाऊ शकता.

पोटदुखी दूर होते

मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भातामध्ये अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पोटाचे दुखणे दूर होते. दही-भात खाल्ल्याने मासिकपाळीच्या आधी होणारा त्रासही कमी होतो.