घरलाईफस्टाईलउष्माघात व उपाययोजना - भाग १

उष्माघात व उपाययोजना – भाग १

Subscribe

भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या तीव्र लाटेबाबत इशारा याहीवर्षी दिला असून, यावर्षी सदर लाट नेहमीपेक्षा लवकर येण्याची आणि सदर लाट दीर्घकाळापर्यंत असण्याचा अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने जीवितास धोका संभवू नये, यासाठी खबरदारीचे उपाय सुचविण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे प्रामुख्याने मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो. महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा या विभागांत उष्माघाताचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून येतो. त्यामानाने इतरत्र प्रमाण अल्पच असते. उष्माघाताने मृत्यू होऊ नये, यासाठी आपण आतापासून जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करून ठेवणे आवश्यक आहे.

अतिजोखमीचे घटक
६५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणार्‍या व्यक्ती, १ वर्षाखालील व १ ते ५ वयोगटातील मुले, गरोदर माता, मधुमेह व हृदयविकार तसेच अल्कोहोलीक व्यक्ती, अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणार्‍या व्यक्ती इत्यादी घटकांना उष्माघात होण्याचा अधिक धोका असतो.

- Advertisement -

उष्माघात होण्याची कारणे
♦ उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
♦ कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
♦ जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे (जसे बेकरी, भेळीच्या भट्ट्या, वीटभट्टी)
♦ घट्ट कपड्यांचा वापर करणे
♦अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

लक्षणे
♦ थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
♦ भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटर्‍यात वेदना येणे अथवा गोळे येणे
♦ रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -