घरलाईफस्टाईलनखे वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

नखे वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

जाणून घ्या नखे वाढवण्यासाठी काय करावे?

अनेकदा मुलींना लांब आणि सुंदर नखे आवडतात. तसेच व्यवस्थित सेट केलेली आणि सुंदर अशा ड्रेसला मॅचिंग असणारी नखे असल्यास सौंदर्यात अजूनच भर पडते. मात्र, स्वयंपाक करणाऱ्या तरुणींना अनेकदा नखे वाढवणे आणि ती जपणे कठीण जाते. त्यामुळे अनकजणी आर्टिफिशिअल नखांचा वापर देखील करतात. परंतु, काही घरगुती उपाय केल्यास तुमचीही नखे सुंदर होण्यास मदत होते.

- Advertisement -

लसूण

अनेकदा लसूण ही जेवणाची चव वाढवण्यास वापरली जाते. मात्र, या लसूणीचा नखे वाढवण्यास देखील फायदा होतो. याकरता ३ ते ४ लसणाच्या कळ्या गरम पाण्यामध्ये मिसळून १५ मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर त्या लसणाची पेस्ट करुन त्यात व्हिटॅमिन ई ची कॅप्सुल आणि लिंबाचा रस एकत्र करुन नखांना लावा. यामुळे नखे स्वच्छ होऊन वाढण्यास मदत होते.

- Advertisement -

नारळाचे तेल

नखे वाढण्यासाठी नारळाचे तेल एक रामबाण उपाय आहे. १ चमचा नारळ तेल घेऊन त्यात १ चमचा मध आणि १ थेंब रोझमेरी तेल घलून मिक्स करावे. हे मिश्रण गरम करुन नखांना लावावे यामुळे नखे मजबूत होऊन वाढण्यास मदत होते.

लिंबू

लिंबाच्या रसात थोडेसे ऑलिव्ह ऑईल घालून ते थोडे गरम करुन त्या तेलाने नखाला मसाज करावे. यामुळे नखे वेगाने वाढतात. तसेच हे शक्य नसल्यास दररोज लिंबाची साल नखांनवर घासल्यामुळे देखील नखे वाढतात.

मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलाने नखांना मसाज केल्यास देखील फायदा होतो. दर आठवड्यातून एकदा केल्यास फायदा होतो.

टोमॅटो

अर्धा कप टोमॅटोच्या रसात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालून आपल्या नखांवर १० मिनिट्स लावून ठेवावे. दिवसातून दोन वेळा असे करावे, यामुळे चांगला फायदा होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -