घरलाईफस्टाईललहान मुलांच्या तापासाठी घरगुती उपाय

लहान मुलांच्या तापासाठी घरगुती उपाय

Subscribe

मुलांना ताप येणे हे खूप सामान्य आहे आणि म्हणून जेव्हा आपल्या मुलाला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरांकडे घेऊन जावे की घरीच उपचार करावेत अशी पालकांची द्विधा अवस्था होते. तथापि तापमानाचे मोजमाप हे काही तापाची चिंता करण्याचे कारण नाही. पालक म्हणून, आपल्या मुलाला बरे वाटत आहे की नाही ह्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर आपल्या मुलास ताप आला असेल आणि तो सक्रिय असेल तर आपल्याला हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. तथापि, अन्न आणि द्रवपदार्थांचे सेवन आणि त्याच्या लघवीच्या स्वरूपाचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे सामान्य असल्यास, घाबरून बालरोगतज्ज्ञांकडे जाण्याची गरज नाही. फक्त मुलाच्या सुधारणेवर लक्ष ठेवा आणि बदलांचे निरीक्षण करा. तथापि, जर आपल्या मुलास अस्वस्थ वाटत असेल आणि ताप १०४ अंश ओलांडत असेल किंवा सतत दोन दिवस टिकत असेल, तर मात्र ताबडतोब डॉक्टरांना भेटा.

♦ कांदे
जर आपण भारतीय असाल तर आपल्या आई किंवा आजीने कांद्याच्या औषधी गुणांविषयी आपल्याला सांगितलेच असेल. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो. तसेच त्यामुळे वेदनाही कमी होतात. यासाठी फक्त अख्ख्या कांद्याचे बारीक तुकडे करावेत आणि काही मिनिटे आपल्या मुलाच्या पायांवर २ ते ३ तुकडे घालावेत. ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया दिवसातून दोनदा केली जाऊ शकते.

- Advertisement -

♦ जिंजर बाथ
तापासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आल्यामध्ये असते. आल्यामुळे शरीरास घाम येण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णता आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. गरम पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये २ चमचे आलं पावडर घाला. पावडर घालून चांगले हलवणे आवश्यक आहे. आपण आपल्या आजारी मुलाला उबदार जिंजर बाथ देऊ शकता. त्यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. लहान मुलांच्या तापावर आलं एक प्रभावी घरगुती उपाय आहे. आंघोळ घालताना, आपल्या मुलाच्या डोळ्यांची काळजी घ्या.

♦ कॅमोमाइल चहा
हा तापासाठी चांगला उपाय आहे. पाणी एक मिनिटासाठी उकळा आणि कॅमोमाईल पाने त्यात घाला, मध घाला आणि आपल्या मुलाला दिवसातून दोन वेळा जितके थेंब तो घेईल तितके द्या. काही मुलांना ह्याची चव आवडत नाही.

- Advertisement -

मध आणि लिंबाचा रस
लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करते. मध आपल्या शरीराला पोषण देते. ताप कमी करण्यात दोघांचे मिश्रण प्रभावी आहे. आपण लिंबू रस १ टेबल स्पून आणि मध १ टेबल स्पून असे मिश्रण करा. चांगले मिक्स करा आणि आपल्या बाळाला द्या. त्याचा ताप निश्चितपणे कमी होईल.

लसूण घातलेल्या मोहरीचे तेल
आपण ऐकले असेल की मोहरीचे तेल आणि लसूण प्रभावीपणे ताप कमी करतात. याव्यतिरिक्त, ते शरीराच्या वेदना कमी करते आणि घामाद्वारे विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. फक्त २ चमचे मोहरीचे तेल गरम करा आणि त्यात १ चमचा लसूण पेस्ट घाला. २ मिनिटे मिश्रण तसेच ठेवा. हे मिश्रण आपल्या मुलाच्या छाती, पाय, तळहात, पाठ आणि मानेला झोपण्याच्या आधी लावा.

अंड्याचे पांढरे बलक
अंड्याच्या पांढर्‍या भागाचे ३ चमचे घ्या आणि एका लहान बाऊलमध्ये चांगले फेटून घ्या. त्यात कापडाचा एक स्वच्छ तुकडा थोडावेळ भिजवून घ्या. नंतर ते कापड मुलाच्या पायावर घाला आणि एका तासासाठी ते तसेच ठेवा. हे आपल्या बाळाच्याशरीराचे तापमान कमी करेल. ताप प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपण ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.

♦ मनुके
अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे मनुकांमुळे प्रभावीपणे ताप कमी होतो. आपण १/२ कप पाण्यात साधारण २५ मनुका एक तासासाठी भिजत घालू शकता. मनुका मऊ झाल्या की थोड्या क्रश करून घ्या, पाणी काढून टाका. अर्ध्या लिंबाचा रस त्यात घाला आणि हे मिश्रण बाळाला दिवसातून दोन वेळा द्या. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -