घरलाईफस्टाईलपोटाचा घेर कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

पोटाचा घेर कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Subscribe

सध्याचा काळ हा आधुनिक आहे. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. यामुळे आपली अंग मेहनत कमी झाली आहे. तसेच ऑफिसमध्ये देखील बसूनच काम असते. त्यातच बाहेरच्या जंक फूडचीही आहारात भर पडते. यामुळे बर्‍याचदा पोट सुटलेले दिसते. मात्र हा पोटाचा घेर सौंदर्यात बाधा आणतो. मात्र आपण घरगुती उपायांनी पोटाचा घेर कमी करुन सुंदर दिसू शकतो. चला तर जाणून घेऊया पोटाचा घेर कमी करण्याचे घरगुती उपाय.

आलं

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आलं फार फायदेशीर ठरतं. आलं, तुळस आणि काळीमिरी एकत्र करुन याचा चहा घ्यावा. हा चहा उपाशी पोटी प्यावा. यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

मध

पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी आलं, तुळस आणि काळीमिरी उकळून त्यात एक चमचा मध, लिंबू घालून ते पाणी प्यायल्याने चरबी वितळण्यास मदत होते.

- Advertisement -

काकडी

पोटाचा घेर कमी करण्यासाठी काकडी खूपच गुणकारी आहे. काकडी खाल्याने पोटाची चरबी कमी होते. याकरता जेवणापूर्वी एक ते दोन काकड्या खाल्ल्याने याचा फायदा होतो.

कोथिंबीर

पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोथिंबीर अत्यंत परिणामकारक ठरते. कोथिंबीरीच्या रसामध्ये अर्धा लिंबू रस आणि एक चमचा मध घालून याचे सेवन करावे. हा काढा रिकाम्या पोटी घ्यावा. यामुळे पोटाचा घेर कमी होतो.

- Advertisement -

जिरं

जेवणानंतर आपण बडिशेपचे सेवन करतो. मात्र त्यासोबत एक-एक चमचा जिरं, बडिशेप आणि ओवा याची पूड करुन याचे कोमट पाण्यासोबत सेवन करावं. यामुळे पोटाची चरबी वितळते.

कोरफड

कोरफड ही औषधी वनस्पती आहे. नियमित एक चमचा कोरफडीचा रस प्यायल्याने ओटीपोटाची चरबी कमी होते.

टोमॅटो

टोमॅटोच्या रसात कळीमिरीची पूड घालून हा तयार ज्यूस प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते. मात्र हा रस घेतल्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -