घरलाईफस्टाईलघरगुती उटण्याने उजळवा तुमची त्वचा

घरगुती उटण्याने उजळवा तुमची त्वचा

Subscribe

सुंदर त्वचा हे चेहर्‍याचे मुख्य आकर्षण आहे. त्वचा आकर्षक दिसण्यासाठी त्वचेची नियमित काळजी घेणं खूप आवश्यक आहे. दिवाळीला हमखास उटणे लावून आंघोळ केली जाते. हे उटणे तुम्ही अगदी योग्य प्रतीचे सामान वापरून घरच्या घरी बनवू शकता. जेणे करून तुमच्या त्वचेला कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही आणि त्वचा आणखीनच सुंदर बनेल.

उटणे हा अगरू, चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेला एक लेप आहे. हा अंगास लावून मर्दन केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो. जुन्या काळात सहजगत्या उपलब्ध असणारे कस्तुरी आणि केशर हे पदार्थ सध्या सहज उपलब्ध नाहीत. उपलब्ध झाल्यास ते बरेच महाग आहेत.

- Advertisement -

त्यास पर्याय म्हणून आजकाल कापूरकाचर्‍या, बावची, गुलाबाच्या सावलीत वाळवलेल्या पाकळ्यांची पावडर, वाळ्याच्या मुळ्यांची पावडर, हळद पावडर, अर्जुन वृक्षाच्या वाळून गळून पडलेल्या सालीची पावडर इत्यादी सुगंधी व औषधी वनस्पती वापरून उटणे तयार करतात.

मसूर डाळ पीठ, आवळकंठी सरीवा, वाळा, नागर मोथा, जेष्टमध, सुगंधी कचोरा, तुलसी पावडर, मंजीस्ट,कापूर हे सर्व साधन एकत्र पावडर करुन त्याचे उत्तम उटणे बनते.

- Advertisement -

या उटण्यास दुधात घट्ट भिजवून त्यात थोडे तिळाचे तेल टाकून मग अंगास लावतात. दिपावलीत अभ्यंगस्नानापूर्वी हमखास उटणे लावले जाते. तर तुम्ही सुद्धा आता या दिपावलीत घरच्या गरीच उटणे बनवून त्याचा वापर करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -