घरलाईफस्टाईलश्रावण स्पेशल रेसिपी - साबुदाणा खीर

श्रावण स्पेशल रेसिपी – साबुदाणा खीर

Subscribe

श्रावण महिना आला की, प्रत्येकाचे उपवास सुरु होतात. कोणी शनिवारी उपवास करतं तर कोणी सोमवारी. म्हणून आज श्रावण स्पेशल मध्ये साबुदाणा खीरची रेसीपी आहे. ही रेसिपी तुम्ही साबुदाणा खिचडीपेक्षा लवकर तयार करू शकता. त्यामुळे नक्की ट्राय करा.

साहित्य

१ वाटी भिजवलेले साबुदाणे, ४ चमचे साखर, चिमुटभर वेलची पुड, काजू, बदाम, पिस्ता

कृती

  • सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेऊन त्यामध्ये दूध ओता आणि ते दूध ५ ते ६ मिनिटे उकळू द्या.
  • दूधाला उकळी आल्यानंतर ते थोडावेळ हलवत राहा. त्यानंतर दूधात भिजवलेला साबुदाणा घालून घ्या.
  • गॅस मंदआचेवर ठेवून ते मिश्रण हलवत राहा. विशेष म्हणजे हे मिश्रण सतत हलवणे गरजेचे आहे. ५ ते ६ मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यावे.
  • हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये ४ चमचे साखर घालावी. मग त्यानंतर मिश्रणात चिमुटभर वेलची पुड घालावी.
  • थोडे बारीक केलेले काजू, बदाम, पिस्ता या मिश्रणात घालावे आणि त्यात केशर घालावे.
  • हे सर्व झाल्यानंतर मिश्रण ५ मिनिट पुन्हा शिजवून घ्यावी. ही झाली साबुदाणा खीर.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -