मूत्रपिंड – मधुमेहामध्ये दुर्लक्ष झालेला एक अवयव

Mumbai
Kidney

मूत्रपिंडे ही वालाच्या आकाराची असतात. ती पाठीच्या मध्यभागी, छातीच्या पिंजर्‍याच्या खालच्या बाजूला असतात आणि पाठीच्या दोन्ही कण्याच्या एकेका बाजूला एक अशी त्यांची रचना असते. मूत्रपिंडे अनेक प्रकारचे नियंत्रकाचे कार्य करतात. यात रक्त गाळून ते शुद्ध करणे आणि रासायनिक दृष्ट्या संतुलित करणे आणि एरिथ्रोपोइटिन या संप्रेरकाची निर्मिती करण्याच्या कार्याचा समावेश असतो. रक्तात अन्नाद्वारे मिसळले गेलेले अनावश्यक घटक काढून टाकणे आणि स्नायूंसारख्या सक्रिय उतींचे विघटन करणे हेही कार्य मूत्रपिंड करते. ग्लुकोज होमोस्टेसिसची पातळी राखण्यात मूत्रपिंडाची महत्त्वाची भूमिका असते आणि मधुमेह असल्यास हायपरग्लायसेमिया आणि इन्सुलिनला प्रतिबंध केल्यामुळे मूत्रपिंडावर प्रतिकूल परिणाम होतो.

मूत्रपिंड विकाराची लक्षणे

घोट्याभोवती आणि डोळ्यांभोवती घाम येत असेल तर मूत्रपिंडाच्या विकाराची सुरुवात झाल्याची शक्यता असते. मूत्रामध्ये प्रथिने नसतील तर मूत्र फेसाळ असते. जसजसा आजार बळावत जातो तसतसे ती व्यक्ती अशक्त, रक्तक्षय होतो, एकाग्र होता येत नाही, पटकन थकवा येतो, भूक मंदावते, मळमळते आणि उलटी येते. मूत्रपिंडाचा विकार जसजसा बळावतो, तसतशी हाडे ठिसूळ होतात आणि पटकन तुटू शकतात. साधी रक्तचाचणी आणि मूत्रचाचणी केल्याने मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान होऊ शकते. मूत्रचाचणीमधून प्रथिनांची कमतरता दिसून येईल आणि युरिया व क्रिएटिनिनचे वाढलेले प्रमाण दिसून येईल.

मधुमेहींनी मुत्रपिंडाची काळजी घेण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

* वेदनाशामक औषधे वर्ज्य करावीत (एनसेड्स आणि कॉक्स २ निरोधक).
* डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या (उलट्या आणि अतिसार).
* मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
* मूत्रपिंडांचे संरक्षण करणारी औषधे घ्यावीत.
* मद्यपान, धुम्रपान आणि तंबाखू टाळा.
* तुमची भूक मंदावली असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्सुलिनचा डोस कमी करा.
* आवश्यकता असेल तेव्हा सुरक्षित वेदनाशामक औषधे घ्या (साधी पॅरासिटेमॉल).
* एनसेड्स समाविष्ट असलेली इमल्शन जेल आणि स्प्रे टाळा.

मूत्रपिंडाच्या विकारांचा धोका कमी करा

* सुदृढ आणि सक्रिय राहणे.
* तुमच्या रक्तशर्करेच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे.
* रक्तातील शर्करेची पातळी नियमित तपासणे.
* सकस आहार आणि वजन नियंत्रणात ठेवणे.
* डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट औषधे घेऊ नका.
* मधुमेह, अतिरक्तदाब किंवा तुम्ही स्थूल असल्यास तसेच तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला मूत्रपिंडाचा आजार असल्यास तुमच्या मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी करून घ्या.

डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here