रिलेशनशिपमध्ये दगा देणारी व्यक्ती कशी ओळखाल?

काही व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येतात मात्र नकळत दगा देऊन निघून जातात. मात्र त्या व्यक्ती कशा ओळखणार असा प्रश्न पडतो. जाणून घ्या रिलेशनशिपमध्ये दगा देणाऱ्या व्यक्ती.

Mumbai
know cheater partner in your relationship
रिलेशनशिपमध्ये दगा देणाऱ्या व्यक्ती

प्रेमात किंवा नात्यामध्ये कोणी दगा दिला की, समोरच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होतं हे काही वेगळं सांगायला नको. तसेच समोरची व्यक्ती फसवणूक करणारी आहे की चांगली आहे. हे ओळखणं देखील कठीण जात. मात्र एका ऑनलाइन मार्केट रिसर्चनुसार आणि डेटा अॅनालिटिक्स फर्मनुसार, पाचपैकी एक व्यक्ती फसवणूक करणारी किंवा दगा देणारी असते हे समोर आलं आहे. काही खास प्रकरारचे लोक असतात. ज्यांची दगा देण्याची शक्यता अधिक असते. ते कोणते लोक आहेत ते जाणून घेऊया.

एकदा दगा देणारी व्यक्ती सुधारत नाही

शोधानुसार, एकदा फसवणूक कराणारा व्यक्ती पूर्णपणे सुधारत नाही. जे लोक एकदा दगा देतात, त्यांचे दगा देण्याचे आणखी कमीत – कमी तीन चान्स असतात. कारण एकदा दगा देणारी व्यक्ती त्या गोष्टीला जस्टिफाय करणं शिकलेली असते. त्यामुळे दगा देणं त्या व्यक्तीसाठी सोप आणि सहज शक्य होतं.

वयही जबाबदार

दगा देण्यामध्ये वय देखील जबाबदार असते. ऑनलाइड डेटिंग साइटच्या शोधानुसार, महिलांचं दगा देण्याचं सरासरी वय ३६ वर्ष असते. रिसर्चनुसार ३० वय असलेल्या व्यक्तींमध्ये दगा देण्याची शक्यता अधिक असते.

पॉर्न पाहणे

सोशल, सायकॉलॉजी अँड पर्सनॅलिटी सायन्यमध्ये रिसर्चनुसार, पॉर्न बघणाऱ्या पुरुषांमध्ये दगा देण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते.

जेनेटिक समस्या

दगा देण्यासाठी जीन्स जबाबदार असल्याचे अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. या रिसर्चनुसार दगा देणाऱ्या लोकांमध्ये ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रोसिनचे रिसेप्टर कमी असतात. जे सेक्सनंतर बॉन्डिंगसाठी जबाबदार असतात. यामुळे लोक कोणतीही अटॅचमेंट नसतानाही कुणाशीही शारीरिक संबंध ठेवू शकतात.

चांगली नोकरी असणारे

जर्नल ऑफ सेक्सच्या एका स्टडीनुसार, जे लोक चांगल्या पदावर नोकरीवर असतात त्यांची दगा देण्याची शक्यता अधिक असते. पॉवरफुल नोकरी असल्याने त्या व्यक्तीमध्ये जास्त आत्मविश्वास येतो आणि त्यामुळे त्यांना वाटत असतं की ते फसवणूक करुन त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात.


हेही वाचा – नेहा कक्कडला सतावतोय प्रेमभंगाचा त्रास

हेही वाचा – नेहा कक्करने एक्स बॉयफ्रेंडला झुरवले; म्हणाली ‘इसमे तेरा घाटा’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here