लसूण सोलण्याच्या ५ हटके पद्धती

लसुण सोलण्याच्या पाच सोप्या पध्दती.

Mumbai
garlic
लसूण सोलण्याच्या ५ हटके पद्धती

स्वयंपाकात लसूण नाही असे केव्हाच होत नाही. कारण जेवणात नसून नसेल तर जेवण पूर्ण देखील होत नाही. मारत ही लसूण सोलण्याचा अनेक गृहिणींना कंटाळा येतो. मात्र, अशा काही हटके पद्धती आहेत. त्याचा वापर केल्यास तुम्ही अवघ्या पाच मिनिटांत सहज लसूण सोलू शकता. चला तर पाहुया अशा सोप्या पद्धती.

पहिली पद्धत

एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात लसूण टाका. एका तासानंतर पाण्यातून लसूण बाहेर काढा आणि जमिनीवर दाबून सोला. लसणाची साल सहज निघण्यास मदत होईल.

दुसरी पद्धत

अवघ्या ३० सेकेंदासाठी लसणाला मायक्रोवेवमध्ये ठेवा. आता तुम्ही जेव्हा हे ती लसूण काढाल तर त्याची साल सहज निघालेली असतील.

तिसरी पद्धत

लसूणमध्ये सुरीने चिरुन दोन भाग करा. यामुळे लसणाचे साल सहज निघण्यास मदत होईल.

चौथी पध्दत

तव्यावर थोडीशी लसूण गरम करुन घ्या आणि मग तिची साल लगेच निघण्यास मदत होईल.

पाचवी पद्धत

लसूण एका भांड्यात घाला आणि ते भांड चांगल हलवा, म्हणजे साल सहज निघेल.