घरलाईफस्टाईलपाठदुखी टाळण्यासाठी काही टिप्स

पाठदुखी टाळण्यासाठी काही टिप्स

Subscribe

पाठदुखी किंवा कमरेच्या दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करू नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करू शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. या वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्कही असू शकते.पाठदुखी टाळण्यासाठी खालील टिप्सचा विचार करा आणि या त्रासातून दूर राहा.

* तळलेले पदार्थ जास्त खावू नका. तळलेल्या पदार्थामुळे कफ होण्यास होऊ शकतो. त्यामुळे पाठदुखीच्या वेदना सतावतात. तसेच खाण्यात साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करावे.

* नियमित व्यायाम करण्यामुळे सरकेलेले हाड व्यवस्थित बसले जाते. तसेच मणक्यामध्ये गॅप पडला असेल तर कोमल तंतू जोडण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केल्यास पाठ दुखणे कमी होऊ शकते.

- Advertisement -

* आपण संगणकासमोबर तासन्तास बसून काम करीत असाल तर बसण्याबाबत लक्षात घ्या. एकाच ठिकाणी जास्त काळ बसू नका.

* तुम्ही थोड्या थोड्यावेळाने जागेवरुन उठले पाहिजे. शक्य झाल्यास पाच मिनिटे चालणे आवश्यक आहे. प्रत्येक एका तासाने ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

* तुम्ही काम करताना थकत असाल तर किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्ही कामाची वेळ निश्चित करा. जेणेकरून पाठदुखी किंवा बॅक पेनपासून थोडी तरी सुटका होईल.

*तुम्ही बसण्यासाठी खुर्चीचा वापर करताना दोन्ही पायांचे तळवे, टाचा जमिनीला टेकतील अशा प्रकारे आसन व्यवस्था करून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

* चुकीच्या पद्धतीने बसण्याचे टाळा. त्यामुळे हाड सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे लोअर बॅक पेनचा त्रास होऊ शकतो.

* आपण काम करताना संगणक आणि डोळे यांचा स्तर आपल्या समान असावा.

* डोके आणि मान वाकवून फोनवर बोलण्याची सवय असले तर त्याने देखील तुमच्या दुखणे वाढू शकते. एकतर ही सवय पूर्णपणे बंद करा अथवा तुम्ही फोनवर बोलण्यासाठी हेडसेट किंवा स्पीकरफोनचा उपयोग करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -