घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात मेकअप कसा टिकवाल?

उन्हाळ्यात मेकअप कसा टिकवाल?

Subscribe

उन्हात देखील आपला मेकअप टिकवायचा असेल तर काय करावे लागेल.

सध्या दिवसा उन्हाचे चटके तर रात्री गारवा जाणवत आहे. मात्र, बऱ्याचदा या उन्हातूनच नोकरीसाठी बाहेर पडावे लागते. अशावेळी जर उन्हात देखील आपला मेकअप टिकवायचा असेल तर काय करावे लागेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मॉश्चरायजरचा वापर

- Advertisement -

उन्हात चेहरा फार तेलकट होतो. हा तेलकटपणा दूर ठेवण्यासाठी आणि त्वचेतला ओलावा टिकवण्यासाठी मॉश्चरायजरचा फायदा होतो. त्यामुळे त्वचा देखील कोरडी राहत नाही.

फाउंडेशनचा वापर टाळा

- Advertisement -

उन्हाळ्यात फाउंडेशनचा वापर करणे शक्यतो टाळावे. मेकअपसाठी बेस म्हणून रेग्लूलर फाउंडेशन वापरण्याऐवजी टींटेड मॉश्चरायजर वापरावे. म्हणजेच काही प्रमाणात फाउंडेशनचे गुणधर्म असलेले मॉश्चरायजर वापरा.

ब्लॉटिंग पेपर वापरा

त्वचेवरचा तेलकटपणा घालवण्यासाठी ब्लॉटिंग पेपरचा वापरा करावा. त्वचेवरचा तेलकटपणा घालवण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचे थर चढवण्यापेक्षा ब्लॉटिंग पेपरचा वापर केल्याने चेहऱ्यावरचा तेलकटपणा अलगद टिपून घ्यावा.

पावडरचा वापर टाळा

अनेकांना पावडर लावण्याची सवय असते. मात्र, ही पावडर चेहऱ्यावर फुटण्यापेक्षा मेकअप सेट करताना पावडरचा वापर न करता स्प्रेचा वापर करावा. यामुळे मेकअप बऱ्याच काळासाठी टिकून देखील राहतो.

स्प्रे वापरा

चेहऱ्यावर अलगद स्प्रे केल्यास चेहऱ्यावरील मेकअप ताजा राहण्यास मदत होते. यासाठी बाजारात काडडी, गुलाब जल आदि उपलब्ध आहेत. त्याचा वापर करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -