घरलाईफस्टाईलसर्वात महागडी मिरची

सर्वात महागडी मिरची

Subscribe

मिरची म्हटले की साधारणपणे डोळ्यांपुढे मिरचीचा तिखटपणा येतो.तसेच मिरचीचे नाव घेताच आपल्या जिभेलाही तिखटपणा जाणवायला लागतो.मिरची म्हटले की ती तिखटच असणार अशी आपली भावना झालेली असता. मात्र मिरचीची अशी एक जात आहे जी चविला तिखट नाही मात्र त्या मिरचाची किंमत प्रचंड असल्याने सर्वांनाच तिचा तिखटपणा झोंबतोय. कारण या मिरचीची किंमत ऐकूनच तुम्हाला देखील मिरची लागेल.या मिरचीला चिल्टेपिन असं म्हटलं जातं. तसेच मदर ऑफ चिलीज या नावानेही या मिरचीला ओळखलं जातं. मटारच्या दाण्यांसारखी दिसणार्‍या या मिरचीची किंमत प्रतिकिलो २४ लाख रुपये इतकी आहे. याचा स्वाद आणि तिखटपणा साल्सा आणि सॉससारखा असतो. अनेक पदार्थांमध्ये या मिरचीची पूड वापरली जाते.या मिरचीचे उत्पादन केवळ पेरु देशात होते. त्यामुळेच याची किंमत अधिक आहे. तसेच या मिरचीच्या बियाही ऑनलाईन खरेदी करण्यास अडचण येते. तसेच या बिया ऑनलाइन उपलब्ध असल्यास त्यांची किंमतही लाखोंच्या घरात असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -