घरताज्या घडामोडीउन्हाळ्यात शरीर थंड ठेवणार 'हे' घरगुती पदार्थ लाभदायक

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणार ‘हे’ घरगुती पदार्थ लाभदायक

Subscribe

शरीर थंड ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करा.

उन्हाळ्यात भयंकर उकाडा वाढतो त्यामुळे सन स्ट्रोकचा सामना करावा लागतो. सध्या वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीरामध्ये उष्णता वाढत आहे. जरी आपण घराच्या बाहेर पडलो नाही तरी देखील शरीरामध्ये उष्णता वाढत आहे. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यासाठी घरगुती उपाय काय आहेत ते जाणून घेणार आहोत.

कोथिंबीरचे पाणी

हिरव्या कोथिंबीरीचे बरेच आरोग्यदायी फायदे असतात. यामध्ये डायट्री फायबर्स, आयर्न, मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतात. यामुळे व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि प्रोटीन वाढण्यास मदत होते. त्यामुळे पाण्यात हिरवी कोथिंबीर भिजत ठेवा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्यात साखर घालून एकत्र करा. हे पाणी प्यायलाने शरीराला थंडावा मिळण्यास मदत होते.

- Advertisement -

कांद्याचा रस

कांद्याचा रस हा उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. कांद्याचा रस कानांच्या मागे किंवा गळ्यावर लावल्याने शरीराचे तापमान कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय कांद्यासोबत जीरे आणि मध एकत्र करून सेवन करू शकता. कच्चा कांदा खाल्ल्यानेही शरीर खंड राहते.

- Advertisement -

ताक आणि नारळाचे पाणी

आपल्या शरीरासाठी आवश्यक व्हिटॅमिन आणि खनिजं प्रदान करण्यासाठी ताक मदत करते. तसेच नारळाचे पाणी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक पद्धतीने इलेक्ट्रोलइट्स संतुलित ठेऊन शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. शिवाय शरीरातील पाण्याची कमतरता कमी होत नाही.

कैरीचे पन्हे

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिणे हे शरीराला अत्यंत लाभदायक असते. शरीरातील तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी कैरीचे पन्हे फायदेशीर असते. शिवाय यामुळे शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोट्रशिअम असते.

चिंचेच पाणी

चिंच गरम पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये एक किंवा अर्धा चमचा साखरेसोबत प्या. यामुळे तुमच्या शरीराचे तापमान सामन्य होण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -