हिरव्या भाज्या स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘ही’ पद्धत

हिरव्या भाज्या स्वच्छ करण्यासाठी काही पद्धती सांगणार आहे. त्यामुळे तुमची हिरवी भाजी काही मिनिटांतच साफ करणे शक्य होईल.

Mumbai
wash vegetables before eating
हिरव्या भाज्या स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' पद्धत

उन्हाळा असो किंवा पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये हिरव्या भाज्या खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. हिरव्या भाज्या बनवायला सोप्या असल्या तरी मात्र, त्या साफ करणे म्हणजे मोठा टास्क असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिरव्या भाज्या स्वच्छ करण्यासाठी काही पद्धती सांगणार आहे. त्यामुळे तुमची हिरवी भाजी काही मिनिटांतच साफ करणे शक्य होईल.

मेथीची हिरवी भाजी

सामान्यत: लोक मेथीची प्रत्येक पाने त्याच्या मुळांपासून वेगळी करतात. परंतु, ते साफ करणे देखील अवघड आहे आणि त्याला वेळही खूप जास्त लागतो. तर मेथीची एक जुडी एका बाजूला धरून चाकूच्या सहाय्याने त्याची मुळे कापून घ्या. यामुळे मेथीची मुळे आणि माती वेगळी होईल आणि केवळ पाने राहतील.

आता ही भाजी धुण्यासाठी भांड्यात पाणी घ्या त्यात काही मिनिटे मेथी घाला म्हणजे सर्व माती त्यातून बाहेर येईल आणि नंतर ती स्वच्छ पाण्यात दोनदा धुवा. काही लोक हिरव्या भाज्या बारीक तुकडे करतात आणि धुतात परंतु, असे केल्याने हिरव्या भाज्यांचे सर्व जीवनसत्त्वे निघून जातात.

पालकची हिरवी भाजी

पालक साफ करण्यासाठी त्याची जुडी एका बाजूला धरा आणि चाकूच्या मदतीने पुन्हा वेगळे करा याने हिरव्या भाज्या नसलेल्या जाड देठांना वेगळे करणे सोपे जाईल. आता काही खराब पाने असल्यास त्यास वेग वेगळे करा आता पालक पाण्यात टाका १० मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने २ ते ४ वेळा धुवा.

मोहरीची हिरवी भाजी

मोहरीच्या हिरव्या भाज्या स्वच्छ करणे सोपे आहे. मोहरीची पाने वेगळे करा आता जर त्याची देठ थोडी कडक असेल तर आपण त्यास तळापासून सोलून देखील घेऊ शकता. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये मऊ पाने वापरतात. जर देठ सोललेली असेल आणि मोठी पाने वेगळी झाली तर हिरव्या भाज्या खूप चवदार बनतात.