घरलाईफस्टाईलपोटावरील चरबी वाढली आहे; करा 'या' एक्सरसाइज

पोटावरील चरबी वाढली आहे; करा ‘या’ एक्सरसाइज

Subscribe

सध्याची असणारी धावपळीची जीवनशैली प्रत्येकाला मानवेल असे नाही. या धावपळीच्या शेड्यूलमुळे कोणालाही स्वतःच्या तब्ब्येतीकडे फारसे लक्ष देता येत नाही. फास्ट लाईफस्टाईलमुळे बऱ्याचदा वेळ कमी असल्याने बाहेर जंक फूड तसेच फास्ट फूड खाण्याला अधिक पसंती दिली जाते. मात्र यामुळे कित्येकदा या पदार्थांचा थेट आपल्या पचनक्रिया आणि शरिराच्या चरबीवर होतो. त्यामुळे कमी वयातच पोटावरील चरबी वाढलेली दिसते. यांमध्ये पुरूषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.

प्रत्येक महिलेचे सुंदर दिसण्याचे स्वप्न किंवा इच्छा असते. याकरिता पुरेशी उंची, शरिररचना उत्तम असण्यासोबत पोटावरील चरबी कमी असावी असे वाटत असते. जर पोटावरील चरबी जास्त असेल तर ती शक्यतो लवकर कमी करता येत नाही. त्याकरिता योग्य आहारासह नियमित एक्सरसाइज करणे आवश्यक असते. वाढते वजन आणि त्यामुळे वाढणारी चरबी यामुळे हृदयरोग तसेत मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. तुमच्या पोटावरील चरबी कमी करायची असल्यास या खास एक्सरसाइज नक्की करून पहा.

- Advertisement -

कॅलरी बर्न करण्यासाठी एक्सरसाईज

तुमचे वजन अधिक वाढले असेल तर तर शऱिरातील कॅलरी बर्न करण्यासाठी रोज तुम्ही सायकल चालवून त्या कॅलरी नियंत्रणात आणू शकतात. तसेच नियमित ४० ते ५० मिनिटे स्विमिंग करून पोटावर वाढलेली चरबी कमी करू शकतात. या दोन्ही एक्सरसाइज तुम्ही नियमित तुमच्या दैनंदिन शेड्यूलमध्ये समाविष्ट करून घ्या.

- Advertisement -

उठण्या-बसण्याकडे अधिक लक्ष द्या

नियमित व्यायाम आहारावर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या उठण्या-बसण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. बसण्याची पद्धत योग्य नसेल तर तुमचे पोट सुटू शकते. त्यामुळे बसताना आणि चालताना तुम्ही ताठच चालायला हवे. रोज फिरायला जाताना ताठ आणि सरळ वेगाने चाला. तुमच्या चालण्याचा वेग कमी असला तर पोटावरील चरबी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

जिमला जाणे आवश्यक नाही

बरेच जण आपले वजन नियंत्रणात आणण्यासाठी जीमला जाणं पसंत करतात. मात्र आवर्जून जीमला जायलाच हवे असे नाही. पोटावरील चरबी तसेच वजन कमी करण्यासाठी पुशअप्स आणि ५ ते ७ मिनिटे दोरीच्या उड्या मारल्याने फायदा होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -