घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटतेंडुलकर-पवार भेटतात तेव्हा...

तेंडुलकर-पवार भेटतात तेव्हा…

Subscribe

परवा म्हणे सचिन तेंडुलकर शरद पवारांना भेटला…आणि ती भेट झाल्याचं चॅनेलवाल्यांना कळलं…

…ऐन निवडणुकीच्या उत्सवात कोणत्याही प्रकारच्या माध्यमांकडे तसा बातम्यांचा तुटवडा नसतो…पण तरीही सचिन तेंडुलकर शरद पवारांना भेटायला गेला ह्याची लेखातल्या संदर्भहीन वाक्यासारखी बातमी झाली…

- Advertisement -

…इतिहासात जसं पुढील उद्गार कुणी, कुणाला उद्देशून आणि कोणत्यां प्रसंगी काढले असा एक प्रश्न असतो तशी राजकारणात कोण कुणाला कुठे आणि का भेटलं, ह्याबद्दल कमालीचं ंकुतुहल चाळवणारी एक बाब असते…

…चॅनेलवाल्यांनी ही बातमी चालवली…आणि काही चिंतामणींच्या डोक्यात किडा वळवळायला सुरूवात झाली…

- Advertisement -

…का बरं भेटला असेल मास्टरब्लास्टर जाणत्या राजांना?…असं काय जाणून घ्यायचं असेल ह्या मास्टरब्लास्टरला जाणत्या राजांकडून की जाणत्या राजांना मास्टरब्लास्टरकडून काही माहिती हवी असेल?…

…तिरपागडे प्रश्न सुरू झाले की चॅनेलवाले आमच्याच चॅनेलवर प्रथमच म्हणत उत्तरांचा त्रिभुज प्रदेश निर्माण करतात…आणि हे प्रश्न पडायला लागले की त्याची उत्तरंही त्यांनी आधीच तयार करून ठेवलेली असतात…

…एका चिंतामणीला वाटलं, सचिनलासुध्दा ह्या गोष्टीची उत्सुकता असणार की साहेब माढ्यामधून लढता लढता एकाएकी माघारी का फिरले?…आणि त्याबद्दलच तो त्यांना विचारायला आला असणार की साहेब तुमचं रनिंग बिटवीन द विकेट इतकं चांगलं असताना तुम्ही मॅच सुरू होण्याच्या आधीच असे रनआउट का हो झालात!…

…दुसर्‍या चिंतामणीला वाटलं की त्यासाठी सचिन पवारांना भेटायला कशाला येईल?व्हिडिओ कॉल करूनसुध्दा बोलेल ना?…पण त्याच चिंतामणीला पुढे असं वाटलं की सचिन नसला तरी कधी कधी पवार रेंजच्या बाहेर असण्याची शक्यता असेल ना?…

…आणखी एकाला वाटलं, पवारांना अश्विनने आयपीएलमध्ये केलेल्या मंकडिंगची रीतसर माहिती सचिनकडून हवी असेल…आणि त्याचा प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये काही उपयोग करता येईल का, ह्याबद्दल काही चर्चा करायची असेल!…

…अशाच एका चिंतामणीला वाटलं, भाजपने जसा गौतम गंभीरला गटवला तसा राष्ट्रवादीसाठी क्रिकेटमधल्या कुणाला कटवता येईल, ह्याचा अंदाज पवारांना सचिनकडून घ्यायचा असणार!…

…दुसर्‍या एकाच्या मते, सचिनने आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानातला स्कोअर जाणून घेतला…आता ह्यावेळी त्याला राजकारणाच्या ह्यावेळच्या आखाड्यातला स्कोअर साक्षात तेल लावलेल्या मल्लाकडून जाणून घ्यायचा असावा!…

…सगळ्या चॅनेल चिंतामणींच्या सगळ्या चिंता व्यक्त झाल्या…आणि नंतर मास्टरब्लास्टर आणि जाणत्या राजांच्या भेटीमागचं वेगळंच सत्य बाहेर आलं…

…झालं होतं असं की सचिन नुकताच शेगावहून परत येत होता…आणि येता येता साहेबांना आवडणारी शेगावची कचोरी घेऊन साहेबांकडे आला होता…

– अँकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -