डोक्याला शॉट : राजकीय बाजीरावांची जाहिरातबाजी!

Mumbai
dokyala shot article
डोक्याला शॉट लेख

दिवस कसे येतात पहा, साबणाकपड्याच्या जाहिराती मागे पडतात… आणि पालटिकलवाल्यांच्या जाहिराती सारख्या सारख्या झळकतात. …पाच वर्षांपूर्वी अच्छे दिन आने वाले है हे स्फूर्तीगीत दर दोन मिनिटाला लागायचं…त्याच्या आधी हम मोदीजी को लाने वाले हैं हे शब्द टॅटूसारखं गोंदवून जायचं… आता पाच वर्षं झाल्यानंतर ’दुख भरे दिन बीते रे भैया’ स्टाइल ’देखो, अच्छे दिन आये है’ अशी काहीतरी जाहिरात येईल असंं वाटलं होतं…पण झालं भलतंच, टीव्हीवर ’मोदी है तो मुमकीन हैं’ आणि ’फिर एक बार मोदी सरकार’ असे शब्द दिसायला लागले…

…कोणे एके काळी जेव्हा टीव्ही नावाचं प्रकरणच नव्हतं तेव्हा आजच्यासारखी कलरफुल जाहिरात नावाची भानगडच नव्हती…’ना जात पर, ना बात पर, इंदिराजी की बात पर, मुंहर लगाओ हात पर’ असं भिंतीवर लिहून काँग्रेसचे लोक मोकळे व्हायचे…

…आता जाहिरातीचं युग आलं आणि निवडणुकीला जाहिरातीचे टेकू लागायला लागले…जणू जाहिरातींचा टेकू काढला तर निवडणुकीचा मंडपच खाली येईल!…

…ह्या जाहिरातींसाठी राजकारणातले यच्चयावत कलाकार जाहिरातीतल्या कलाकारांचा आधार घेऊ लागले…आणि जााहिरातीतले कलाकार जाहिरातीपुरतं तरी रोजगार मिळवू लागले…

…त्या तिथल्या लोकांनी ’जनता तुम्हाला माफ करणार नाही’ असं त्यांच्या जाहिरातीतून म्हटलं…म्हणून ह्या इथले लोक आपल्या जाहिरातीतून ’ह्यांना लाज कशी वाटत नाही’ म्हणणार हे ओघाने जाहिरातीत आता येत असतंच!…

…चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांनंतर जाहिरातीला पासष्ठावी कला म्हणतात…ह्या पासष्ठाव्या कलेचा वापर टेलिव्हिजनच्या युगात राजकारणातले कारागीर इतका बेमालूम अभिनयाने साजरा करतील असं त्या कलेलाही वाटलं नसेल!…

…जाहिरातवाले तरी काय करणार तर ते ज्या राजकीय पक्षाच्या जाहिरातीचं काम मिळणार त्यासाठी आपला मेंदू वापरणार…उद्या ह्यांची जाहिरात झाली की परवा त्यांच्या जाहिरातीसाठी डोकं खाजवणार!…

…ते देश का मीठ म्हणत मिठाचीही जाहिरात करणार…आणि ज्यांचं मीठ खाणार त्यांच्या मिठाशी प्रामाणिक राहत त्यांचीही जाहिरात करणार!….

…कालच्या जाहिराती स्वस्त जमान्यातल्या होत्या आणि स्वस्त होत्या…आजचा महागाईचा काळ आहे, त्या महाग झाल्या आहेत…

…आज जनतेचं कोटकल्याण करण्यासाठीच्या जाहिरातीसाठी हजार कोटी लागताहेत…जाहिरातीला म्हणूनच कोटी कोटी प्रणाम!…

अँकर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here