घरमहा @२८८अकोले विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २१६

अकोले विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २१६

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील अकोल (विधानसभा क्र. २१६) विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत. रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.

मतदारसंघ क्रमांक – २१६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसुचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,२६,०७०
महिला – १,१२,३५०

- Advertisement -

एकूण मतदार – २,३८,४२०

 

विद्यमान आमदार – वैभव पिचड,राष्ट्रवादी

वैभव पिचड पुढील आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अकोले मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांनी आपले आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) वैभव पिचाड, राष्ट्रवादी – ६७६९६
२) मधूकर तळपदे,शिवसेना – ४७,६३,४
३) अशोक भांगरे, भाजपा – २७,४४,६
४) गंगा भांगरे,माकप – ११,८६,१
५) सतीश भांगरे, काँग्रेस – ४३९१


हे वाचा – अहमदनगर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -