घरमहा @२८८नवापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ४

नवापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ४

Subscribe

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (विधानसभा क्र.४) विधानसभा मतदारसंघ आहे.

नवापूर मतदार संघ हा नागपुर सुरत महामार्गावर वसला असुन या मतदार संघावर देखिल काँग्रेसची पकड राहीली आहे. नवापूर मतदार संघात ग्रामीण भागात कुक्कुट पालनाचा मोठा उदयोग आदीवासी बांधवांनी विकसीत केला. या भागातील अंडी देशभरात निर्यात होत असल्याने या व्यवसायाला एकेकाळी भरभराटीचे दिवस होते. पण बर्ड प्ल्ु या आजाराने या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. हा भाग भात शेतीसाठी देखिल ओळखला जातो. या मतदार संघात औदयोगिक वसाहतीचा अभाव असला तरीही शेती या मुख्य व्यवसायावर या मतदार संघाचे आर्थिक गणित अवलंबुन आहे. या मतदार संघात आदीवासी पावरा व आदीवासी कोकणी मतदारांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.

मतदारसंघ क्रमांक –

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसुचित जमाती

मतदार संख्या
पुरुष – १,४०,४२९
महीला – १,४७,१९०
इतर – १
एकुण २,८७,६१४

- Advertisement -

विदयमान आमदार सुरुपसिंग नाईक

नवापूर मतदार संघातुन सुरुपसिंग नाईक यांनी आतापावेतो तब्बल आठ वेळेस विजय मिळवला आहे.  हा मतदार संघ अपवाद वगळता नेहमी काँग्रेसच्या पाठीशी राहीला आहे. त्यामुळे पक्षाने या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे सुरुपसिंग नाईक यांना वन मंत्री पदावर काम करण्याची संधी दिली. नाईक यांनी सर्वात आधी 1985 मधे या मतदार संघातुन काँगेसच्या तिकीटावर उमेदवारी केली. त्यानंतर सलग पाच वेळेस त्यांनी विजयी घोडदौड सुरु ठेवली. पण 2009 मधे त्यांना समाजवादी पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी करणारे शरद गावीत यांच्याकडुन पराभुत व्हावे लागले. यानंतर 2014 मधे पुन्हा मतदारांनी सुरुपसिंग नाईक यांना काँग्रेसच्या उमेदवारीवर विधानसभेत पाठवले.

नवापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरूपसिंग नाईक

 

2014 मधील विधानसभा निवडणुकीतील स्थिती

सुरुपसिंग नाईक – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ९३,७९६
शरद गावीत – राष्ट्रवादी – ७१,९७९
कुंवरसिंह वळवी – भारतीय जनता पार्टी – ११,२३६
ज्येात्सना गावीत – शिवसेना – ३,९७७


हे ही वाचा – नंदुरबार लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -