घरमहा @२८८वरोरा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७५

वरोरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७५

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा (विधानसभा क्र. ७५) विधानसभा मतदारसंघ आहे.

वरोरा हा मतदारसंघ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच चर्चेत आला. वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळु धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली. विशेष म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री हसंराज अहिर यांचा पराभव करण्याची किमया धानोरकर यांनी साधली. तसेच महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला.

मतदारसंघ क्रमांक – ७५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४६,५४१
महिला – १,३२,३५०

- Advertisement -

एकूण मतदान – २,७८,८९१

विद्यमान आमदार (राजीनामा देऊन खासदार) – सुरेश (बाळू) धानोरकर

सुरेश धानोरकर यांनी २० मार्च रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली आणि खासदार म्हणून निवडूनही आले. लोकसभेला भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर त्यांनी भाजपवर बरीच टीका केली होती. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही, हे कळताच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. सुरेश धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसला महाराष्ट्रातील एकमेव आणि विदर्भात खासदार मिळाला. धानोरकर यांनी आमदारकीच्या चार वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात आपली राजकीय ताकद निर्माण केली होती.

MLA Suresh Balu Dhanorkar

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुरेश ऊर्फ बाळुभाऊ धानोरकर, शिवसेना – ५३,८७७
२) संजय देवतळे, भाजप – ५१,८७३
३) आसावरी देवतळे, काँग्रेस – ३१,०३३
४) अॅड. भुपेंद्र रायपुरे, बसपा – १८,७५९
५) डॉ. अनिल बुजोने, मनसे – ७,९८१

हे वाचा – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -