४७ – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

Mumbai
47 - kolhapur loksabha constituency
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ नकाशा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदार संघ दूध प्रकल्प, ऊस शेती, ऊस कारखान्यांसाठी ओळखला जातो. या जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. कोल्हापूरला स्वत:ची ऐतिहासिक ओळख आहे. प्राचीन वारसा लाभलेल्या शहरात प्रागैतिहासिक काळापासून ब्रिटिशकालीन, स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंतच्या अनेक वास्तू आहेत. कोल्हापूर मतदारसंघाचे एकूण क्षेत्रफळ ७,६८५ चौरस किमी आहे. या मतदारसंघामध्ये चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कोल्हापूर उत्तर असे ६ तालुके येतात.

मतदारसंघ क्रमांक – ४७

नाव – कोल्हापूर

संबंधित जिल्हे – कोल्हापूर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

प्रमुख शेतीपीक – ऊस

शिक्षणाचा दर्जा – ८२.९०%

मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार – १२ लाख ५८ हजार ९८६

महिला-पुरुष मतदार

पुरुष – ६ लाख ६३ हजार ५६५

महिला – ५ लाख ९५ हजार ४२१


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

संजय मंडलिक – शिवसेना – ७ लाख ४९ हजार ०८५

धनंजय महाडिक – राष्ट्रवादी काँग्रेस – ४ लाख ७८ हजार ५१७

डॉ. अरुण मोहन माळी – वंचित बहुजन आघाडी – ६३ हजार ४३९

नोटा – ८ हजार ६९१

संदीप गुंडोपंत संकपाळ – अपक्ष – ५ हजार ९५५


कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ

२७१ – चंदगड – संध्यादेवी देसाई – कुपेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

२७२ – राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना

२७३ – कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस

२७४ – कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक,भाजप

२७५ – करवीर – चंद्रदीप नरके, शिवसेना

२७६ – कोल्हापूर उत्तर – राजेश क्षीरसागर, शिवसेना


MP Dhananjay mahadik
खासदार धनंजय महाडिक

विद्यमान खासदार – धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस

धनंजय महाडिक हे सोळाव्या लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडून आले. धनंजय महाडिक हे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संदय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता. कोल्हापुरातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात महाडिक कुटुंबिय गेल्या अनेक वर्षापासून आहे. धनंजय महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला होता. संसदेत सर्वाधिक प्रश्‍न उपस्थित करून देशातील टॉप वन खासदार म्हणून निवड झाल्यानंतर महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.


२०१४ लोकसभा निवडणुकीची आकडेवारी

धनंजय महाडिक – राष्ट्रवादी काँग्रेस – ६ लाख ७ हजार १८४

संजय मंडलिक – शिवसेना – ५ लाख ७३ हजार ६४२

संपतराव पाटील – अपक्ष – १३ हजार १५४

संदीप सकपाळ – अपक्ष – १० हजार ९६३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here