घरमहा @४८३८ - शिर्डी लोकसभा मतदारसंघ

३८ – शिर्डी लोकसभा मतदारसंघ

Subscribe

अहमदनगर जिल्ह्यातील दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी. पुर्वीचा कोपरगाव या नावाने ओळखला जाणारा हा मतदारसंघ २००९ साली झालेल्या पुनर्रचनेत शिर्डी या नावाने ओळखला जाऊ लागला. तसेच याच वर्षी अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित करण्यात आला. २००९ साली शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. कोपरगाव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे दिर्घकाळ वर्चस्व होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे पाटील हे या मतदारसंघातून नऊ वेळा खासदार झाले होते. मात्र मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर इथे २००९, २०१४ सलग शिवसेनेचा उमेदवार निवडून आला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. निळवंडे धरणावरून या मतदारसंघात नेहमीच राजकारण होत आले. धरणाचे काम पुर्ण झालेले असून कालव्याचे काम अद्याप बाकी आहे.

- Advertisement -

 

मतदारसंघ क्रमांक – ३८

- Advertisement -

नाव – शिर्डी

संबंधित जिल्हा – अहमदनगर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती (SC)

मतदारांची संख्या (२०१४) – १४ लाख ५९ हजार १२२

पुरुष – ७ लाख ६६ हजार ०१५

महिला – ६ लाख ९३ हजार १०६


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल

सदाशिव लोखंडे- शिवसेना – ४ लाख ८६ हजार ८२०

भुषणसाहेब मल्हारी कांबळे -काँग्रेस – ३ लाख ६६ हजार ६२५

संजय लक्ष्मण सुखदान -वंचित बहुजन आघाडी – ६३ हजार २८७

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे – अपक्ष – ३५ हजार ५२६

अॅड. बंसी भाऊराव सातपुते – कम्युनिस्ट पार्टी – २० हजार ३००


शिर्डी मधील विधानसभा मतदारसंघ

२१६ अकोले (ST) – वैभव पिचड, राष्ट्रवादी

२१७ संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस

२१८ शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेस

२१९ कोपरगाव – स्नेहलता कोल्हे, भाजप

२२० श्रीरामपूर (SC) – भाऊसाहेब कांबळे, काँग्रेस

२२१ नेवासा – दादासाहेब मुरकुटे, भाजप


sadashiv lokhande mp
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे २०१९ चे खासदार सदाशिव लोखंडे

विद्यमान खासदार – सदाशिव लोखंडे, शिवसेना

सदाशिव लोखंडे हे २०१४ साली नाट्यमयरित्या खासदार म्हणून निवडून आले. २००९ साली आठवलेंना पराभवाची धुळ चारणारे शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी ऐनवेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेने माजी आमदार बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली. मात्र बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडकल्यामुळे घोलप यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर अगदी थोड्या दिवसात सदाशिव लोखंडे यांना तिकिट मिळाले. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेला दगा दिल्यामुळे मतदारांनी सदाशिव लोखंडे यांना विजयी केले.

सदाशिव लोखंडे हे मुळ या मतदारसंघातील नसल्यामुळे त्यांना २०१९ ला तिकिट मिळणार नाही, असे बोलले जात होते. मात्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदाशिव लोखंडे यांनाच उमेदवारी मिळणार असे सांगितले आहे. खासदर सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे धरणासाठी केंद्रीय जल आयोगाची मान्यता आणली. तसेच दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची जुनी मागणी लोखंडेच्या कार्यकाळात पुर्ण झाली. त्यात आता शिवसेना – भाजप युती झाल्यामुळे लोखंडे यांचा मार्ग सुकर झालेला आहे.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

सदाशिव लोखंडे, शिवसेना – ५ लाख ३२ हजार ९३६

भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस – ३ लाख ३३ हजार ०१४

नितीन उदमाले, आप – ११ हजार ५८०

अॅड. महेंद्र शिंदे, बसपा – १० हजार ३८१

नोटा – ९ हजार ८७९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -