घरमहाराष्ट्रराज्यात १०,२४४ नवे रुग्ण, २६३ जणांचा मृत्यू

राज्यात १०,२४४ नवे रुग्ण, २६३ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात १०,२४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,५३,६५३ झाली आहे. राज्यात २,५२,२७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात १०,२४४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४,५३,६५३ झाली आहे. राज्यात २,५२,२७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३८,३४७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

- Advertisement -

राज्यात २,५२,२७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २६३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४७, ठाणे ८, नवी मुंबई मनपा ३, मीरा भाईंदर मनपा ६, वसई विरार मनपा ४, रायगड ४, पनवेल मनपा ६, नाशिक ८, अहमदनगर ४, जळगाव २, पुणे २७, पिंपरी चिंचवड मनपा ३, सोलापूर ६, सातारा १५, कोल्हापूर २५, सांगली ११, जालना १४, लातूर ५, नांदेड १०, अमरावती ५, यवतमाळ १२ आणि नागपूर २० यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या २६३ मृत्यूंपैकी १३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७२ मृत्यू पुणे १७, कोल्हापूर १२, नागपूर ९, जालना ९, यवतमाळ ७, सातारा ५, ठाणे ५, नाशिक २, रायगड २, बीड १, भंडारा १, हिंगोली १ आणि सांगली १, असे आहेत. आज १२,९८२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत ११,६२,५८५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७१,६९,८८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४,५३,६५३ (२०.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,००,१६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २६,७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -