घरमहाराष्ट्रशिवजयंती: कर्ज काढून, दागिने विकून साकारले महाराज

शिवजयंती: कर्ज काढून, दागिने विकून साकारले महाराज

Subscribe

आपल्या मुलीचं जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी २० लाख रुपयांचे कर्ज काढले आहे.

सौजन्य – सोशल मीडिया

सूत्रांच्या माहितीनुसार, कोपरगावमधील कोकमठाण गावातील जंगली महाराज आश्रमाजवळील फुलपगार फार्म याठिकाणी ही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भव्य-दिव्य रांगोळी साकारणारी सौंदर्या यानिमित्ताने विश्वविक्रमासाठी तिचं नोंदवणार आहे. ही रांगोळी काढण्यासाठी सौंदर्याला तिच्या आई-वडिलांचीही मोलाची साथ लाभली. घरची परिस्थीती सर्वसाधारण असूनही केवळ महाराजांवरील प्रेमापोटी सौंदर्या आणि तिच्या कुटुंबियांनी ही भव्य रांगोळी काढण्याचा निर्णय घेतला. या रांगोळीसाठी तब्बल २० लाख रुपये इतका खर्च आल्याचे समोर आले आहे. आपल्या मुलीचं जगातील सर्वात मोठी रांगोळी काढण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढले. मुलीच्या आईने तर तिचे दागिने विकल्याचंही सूत्रांकडून समजत आहे.

सौंदर्याने २६ जानेवारीपासून या रांगोळीचा प्रारंभ केला होता. ती दररोज १२-१२ तास रांगोळीचं काढायची. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार १४ व्या वर्षी केला होता. त्याच धर्तीवर वयाच्या १२ व्या वर्षी सौंदर्याने महाराजांना आदरांजली म्हणून ही रांगोळी साकारण्याच निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -