Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात २,९३६ नवे रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

राज्यात २,९३६ नवे रुग्ण, ५० जणांचा मृत्यू

राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,१५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात २,९३६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,७४,४८८ झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ५१,८९२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,१५१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, ठाणे ४, नाशिक ५, सातारा ५, यवतमाळ ५, बुलढाणा ३, नागपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ९ मृत्यू, नागपूर ३, नाशिक ३, बुलढाणा २ आणि रायगड १ असे आहेत.

- Advertisement -

आज ३,२८२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७१,२७० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३५,००,७३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,७४,४८८ (१४.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२७,८७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -