घरमहाराष्ट्रपुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू

Subscribe

पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात घडला आहे. या अपघात ३ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे-सातारा महामार्गावर सोमवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावरील शिवापूर फाट्याजवळ घडला. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन तरुण तळजाई टेकडीवर गेले होते. टेकडीकडून ते शिवापूरच्या दिशेला निघाले. ते दर्ग्याच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, शिवापूरच्या फाट्याजवळ केंढणजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -