गुप्तधनासाठी ९ वर्षांच्या चिमुकल्याचा नरबळी

कुटुंबातील व्यक्तींची शारिरीक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी एका ९ वर्षाच्या मुलाचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Solapur
9 years old boy got killed for secret treasure
गुप्तधनासाठी ९ वर्षांच्या चिमुकल्याचा नरबळी

जग २१ व्या शतकात जरी वाटचाल करत असले, तरी देशातल्या काही गोष्टी अजूनही मागच्याच शतकात असल्याचं सिद्ध करत असल्याची एक घटना समोर आली आहे. स्वत:सह कुटुंबातील व्यक्तींची शारिरीक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी एका व्यक्तीने ९ वर्षाच्या मुलाचा नरबळी दिल्याचे समोर आले आहे. ही घटना सोलापूरमधील मंगळवेढा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणाऱ्या प्रतीक मधुकर शिवशरण (९) या शाळकरी मुलाचे गेल्या २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर प्रतीकचा सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात उसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह निर्घृणपेण खून करुन टाकलेल्या अवस्थेत आढळला. प्रतीच्या डोक्याचे केस संपूर्णत: कापलेले होते तर डावा पाय देखील पूर्ण तोडून गायब केलेला आढळून आला होता. मात्र त्या ठिकाणी जवळच हिरव्या रंगाची चोळी, बांगड्याही मिळून आल्याने हा नरबळी असल्याचा संशय बळावला होता. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी या गोष्टी जाळून टाकलेल्या असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एका अल्पवयीन आरोपी अटकेत असताना आता मुख्य आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे.


वाचा – शंभर तरुणी, महिलांना अंनिसने केले जटमुक्त

वाचा – नवस फेडण्यासाठी मुलाला ८ किमी विवस्त्र चालवले


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here