घरमहाराष्ट्ररामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोठा अपघात टळला

रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेनंतर मोठा अपघात टळला

Subscribe

केंदीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस थोडक्यात बचावले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांची पिंपरी-चिंचवड येथे आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे असणाऱ्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलीस हे लिफ्टने खाली येत असताना अपघात झाला. लिफ्ट थेट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर जोरात आदळली. या घटनेत कोणीही जखमी नसले तरी केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्वतः अपघात होण्याच्या अगोदर याच लिफ्ट मधून खाली आले होते.

हे वाचा – शरद पवारांचा ‘चान्स’ हुकला; म्हणून मनमोहन सिंग अॅक्सिडेंटल पीएम – आठवले

सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर पुतळ्यामागे एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. एका तासानंतर पत्रकार परिषद संपली काही कार्यकर्ते आणि पोलीस, पत्रकार हे लिफ्टमधून खाली येत होते, त्याच दरम्यान लिफ्ट अर्ध्यात अडकली यामुळे काही मिनिटे सर्व जण आत अडकले होते. हॉटेल प्रशासनाने प्रयत्न सुरू केले परंतु लिफ्ट दुरुस्त होत नव्हती. अखेर अचानक लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर जोरात आदळली. या घटनेमुळे पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि कार्यकर्ते घाबरले होते. अचानक झालेल्या प्रकारामुळे सर्वजण गोंधळून गेले. दरम्यान या घटनेत कोणीही जखमी नसून सर्व जण सुखरूप आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे काही मिनिट अगोदर याच लिफ्ट मधून खाली उतरले होते.

- Advertisement -

 

हेही वाचा – विश्रामगृहाच्या लिफ्टमध्ये अडकलेले १९ भारिप कार्यकर्ते थोडक्यात बचावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -