घरमहाराष्ट्र'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या', अण्णांची मुख्यमंत्र्यांवर टीका

‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या’, अण्णांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Subscribe

लोकायुक्ताच्या मुद्द्यावरुन येत्या ३० जानेवारीला राळेगण सिध्दी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी अण्णांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

लोकपाल कायद्यानुसार लोकायुक्त कायद्यावरुन सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे चांगले मुख्यमंत्री मिळाले म्हणुन आपण कौतुक करत होतो. मात्र, सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी लोकायुक्त कायदा झाला नाही. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. राळेगण सिध्दी येथे झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी ही टीका केली आहे.

खुर्ची हातात येताच मुख्यमंत्री बदलले

मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना अण्णा यांनी असे सांगितले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगले आहेत असे मला वाटत होते. पण सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरी लोकायुक्त नियुक्त केले गेले नाही. फडणवीस चांगले आहेत, असे वाटत होते. मात्र, खुर्ची हातात आल्यानंतर ते देखील बदलले. लोकायुक्ताच्या मुद्द्यावरुन येत्या ३० जानेवारीला राळेगण सिध्दी येथे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी अण्णांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

- Advertisement -

आंदोलनाची दिशा ठरवली

या बैठकीमधून आंदोलनाची दिशा काय असणार आहे?, आंदोलन कशा पध्दतीन केले जाणार ? यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या मुद्द्यावर देशभरातील कार्यकर्त्यांची २४ जानेवारीला राळेगण सिध्दी येथे बैठक होणार आहे. यावर देखील आज चर्चा करण्यात आली. अण्णा हजार यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आंदोलन करण्यासाठी राळेगण सिध्दी येथे न येता ते ज्या ठिकाणी आहेत तिथे राज्य पातळी आणि जिल्हा पातळीवर आंदोलन करण्याचे सांगितले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

निवडणुकांच्या तोडांवर अण्णांचे पुन्हा उपोषण अस्त्र

मूर्तींची उंचीपेक्षा विचारांची उंची वाढवा; अण्णांचा सरकारला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -