घरमहाराष्ट्रजाहिराती बघून तेल, साबण निवडा, सरकार नव्हे!

जाहिराती बघून तेल, साबण निवडा, सरकार नव्हे!

Subscribe

 महाराष्ट्र शासन न केलेली कामे तुमच्या आमच्या माथी मारण्यासाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत आहे. राज्य सरकाराच्या प्रत्येक तासाला 10 जाहिराती दाखवल्या जातात, एका जाहिरातीसाठी साधारणत: 12 हजार रुपये इतका खर्च करवा लागतो. त्यामुळे राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत आहे. त्याचप्रमाणे 2014च्या निवडणुकीनंतर समजले की पूर्वी आई- वडील सांगायचे जाहिराती बघून तेल आणि साबण यांच्यासारख्या वस्तू निवडायच्या असतात सरकार निवडायचे नसते, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर टीकास्त्र सोडले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारच्या जाहिरातींवर सडकून टीका केली. खासदार डॉ. कोल्हे यांनी याआधी देखील शिवस्वराज्य यात्रेत माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे, तर तुम्ही कसे निवडून आलात, असे प्रश्न विचारतात.

- Advertisement -

मात्र जर ईव्हीएम नसते, तर शिरुरमधून एक शेतकर्‍याचा साधा पोरगा फक्त साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आला नसता, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी राजीनामा देण्यास तयार असून आता ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास दोन-अडीच लाखांनी निवडून नाही आलो, तर माझे नाव बदला, असे आव्हान डॉ. कोल्हे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -