घरमहाराष्ट्रहर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला, शिवसैनिकांवर संशय

हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला, शिवसैनिकांवर संशय

Subscribe

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरावर मध्यरात्री त्यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला.

कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील घरावर मध्यरात्री ४ अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामागे शिवसैनिकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एका प्रचारसभे दरम्यान आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. यामुळेच त्यांच्या घरावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुधवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. पण अद्याप हर्षवर्धन जाधव यांनी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

या हल्ल्यात हर्षवर्धन

हल्लेखोरांनी हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक केली. या हल्ल्यात त्यांच्या घराच्या काचा फुटल्या. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे कुटुंबीय हे कन्नडमध्ये राहत आहेत. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचे कुटुंबीय सुखरुप आहेत.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका

हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका केली होती. हर्षवर्धन जाधव यांचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या भाषणामुळे औरंगाबादमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -