Friday, August 7, 2020
Mumbai
27.8 C
घर ताज्या घडामोडी नवरा अमेरिकेतून परत येत नाही म्हणून बायको बसली उपोषणाला

नवरा अमेरिकेतून परत येत नाही म्हणून बायको बसली उपोषणाला

चक्क नवऱ्याविरोधात बायकोने सासरच्या दारात उपोषण केलं आहे. या उपोषण माहेरच्या कुटुंबाने देखील साथ दिली आहे.

Aurangabad
aurangabad vaijapur wife protest against to husband because of he did not return from united state
नवरा अमेरिकेतून परत येत नाही म्हणून बायकोने केले आंदोलन

आपण अनेक वेळा मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून किंवा सरकार विरोधातील आंदोलने पाहिली आहेत. मात्र तुम्ही नवऱ्या विरोधातील आंदोलन पाहिलं आहेत का? असं अगळं वेगळं आंदोलन औरंगाबाद येथे करण्यात आलं आहे. चक्क एका बायकोने आपल्या नवऱ्याविरोधात बंड पुकारला आहे. अमेरिकेतून नवरा परत येत नाही या कारणाने ती उपोषणाला सासरच्या दारात बसली आहे. औरंगाबाद मधील वैजापूरमध्ये हे आंदोलन केलं जातं आहे.

प्राजक्ता डहाळे असं या आंदोलकर्त्या तरुणीचं नावं असून तिच्यासोबत तिचं सर्व कुटुंब देखील आंदोलन करत आहेत. नवरा अमेरिकेला जाऊन बसला असून तो परत येतच नाही आहे त्यामुळे प्राजक्ताने हे आंदोलन सुरू केलं आहे. ‘सून येथे आणि मुलगा अमेरिकेला, अशा सासू सासऱ्यांचं करायचं काय?’, ‘अमेरिकेतून येत कसा नाही, आला पाहिजे’, ‘मुलीवरचा अन्याय आता सहन करणार नाही’ अशाप्रकारच्या घोषणा आंदोलनात दिल्या जात आहेत. तसंच मुलगा अमेरिकतून परत कधी येणार? असा सवाल विचारला जातं आहे. याबाबत प्राजक्ताने सांगितलं की, माझे पती अमेरिकेला गेले पण आता वारंवार सांगूनही ते परत येत नाही म्हणून आंदोलनाचा मार्ग आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

या आंदोलनामुळे अखेर सासऱ्यांनी घराच्या बाहेर येऊन मुलगा १३ तारखेला येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर सगळं सुरळीत होईल असं देखील त्यांनी सांगितलं. तसंच १४ फेब्रुवारीला व्हॅलेटाईन डे असल्यामुळे हा मुहूर्त संसार पुन्हा सुरू करण्यासाठी चांगला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा – सोलापूर भाजप खासदारांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बनावट? याचिका दाखल