घरमहाराष्ट्रभामा-आसखेड धरणग्रस्तांना दिवाळी भेट

भामा-आसखेड धरणग्रस्तांना दिवाळी भेट

Subscribe

७५ खातेदारांना पहिल्या टप्प्यात जमिनीचे वाटप

दिवाळीच्या तोंडावर भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला अखेर सुरुवात झाली आहे. जमिनीला,जमीन या मागणीनुसार, राजगुरुनगरयेथील प्रांताधिकारी कार्यालयात जमिनीचे वाटप चालू करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांना थेट जमिनीचा सातबारा मिळणार आहे. राज्यातील ही पहिलीच पुनर्वसन प्रक्रिया प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नियोजनाखाली सुरु झाली आहे.

भामा-आसखेड धरणग्रस्तांचा तीस वर्षांपासून आपल्या हक्काच्या पुनर्वसनासाठी लढा सुरु होता. धरणग्रस्तांनी संघर्षाचा लढा पुकारुन जॅकवेल आणि पाईप लाईनचे काम बंद केले. त्यानंतर एका प्रकल्पग्रस्ताने धरणातील पाण्यात जलसमाधी घेतली होती. त्यामुळे प्रशासन नमले आणि पुनर्वसनाला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खेड प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांची निवड केली होती. त्यानुसार खेड व दौंड तालुक्यातील तलाठी सर्कल,आमदार सुरेश गोरे,भाजप तालुका अध्यक्ष अतुल देशमुख,धरणग्रस्त कृती समितीचे देवीदास बांदल,सत्यवान नवले व सर्व विभागांचे शासकिय आधिकारी यांच्यासमोर पारदर्शकपद्धत राबवून जमिनीचे वाटप केले आहे.

कसे असेल पुनर्वसन

भामा-आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसन कोर्टाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील खेड आणि दौंड तालुक्यात करण्यास सुरुवात झाली आहे. १७०० धरणग्रस्तांपैकी ७५ खातेदार शेतकर्‍यांच्या पहिल्या यादीनुसार १०१.९३ हेक्टर जमिनीच्या वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये २२ भूमिहीन तर ५३ अल्पभूधारक शेतकर्‍यांना स्वत:च्या मागणीनुसार जमिनीचे वाटप करत पुनर्वसन आदेश, तहसिलदार आदेश, सर्कल फेरफार, तलाठी नोंद ही सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी, एकाच वेळी सुरु आहे. धरणग्रस्त शेतकर्‍यांना सातबारा हातात दिला जात आहे

- Advertisement -

भामा-आसखेडच्या १७०० धरणग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण हक्कानुसार होईपर्यंत हा संघर्षाचा हा लढा सुरु रहाणार आहे. भामा-आसखेड धरणातील प्रत्येक पाण्याच्या थेंबावर भामा खोर्‍यातील शेतकर्‍यांचा अधिकार राहणार आहे. पुनर्वसन होत असताना शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणीची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
-देविदास बांदल, सदस्य, भामा-आसखेड धरणग्रस्त कृती समिती

भामा-आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतली असून ही धरणग्रस्तांना दिवाळी भेट आहे. राज्यात पहिल्यांदाच, एका दिवसात सातबारा शेतकर्‍यांच्या हातात दिला जात आहे. प्रत्येक शेतकर्‍यांचे पुनर्वसन करुन त्यांच्या मागणीनुसार जमीन दिली जात आहे. लवकरच या जमिनींचा ताबा दिला जाणार आहे.
-अतुल देशमुख, अध्यक्ष , भाजप तालुका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -