घरमहाराष्ट्रचंद्रपूर, नाशिकमधील भाजप नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले?

चंद्रपूर, नाशिकमधील भाजप नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवले?

Subscribe

पुढील आठवड्यात राज्यातील काही शहरांमध्ये महापौरपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि नाशिकमधील भाजपच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्याची खलबंत सुरु करण्यात आली आहेत.

पुढील आठवड्यात राज्यातील काही शहरांमध्ये महापौरपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर आणि नाशिकमधील भाजपच्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्याची खलबंत सुरु करण्यात आली आहेत. नाशिकमधील भाजपचे १५ नगरसेवक सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु असून त्या सर्व नगरसेवकांना एकत्रित अज्ञातस्थळी ठेवले जाणार असल्याचे समजते. नाशिकमध्ये येत्या २२ तारखेला महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होत नगरसेवक फोडण्याच्या भीतीने भाजपकडून हे पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे नाशिकच्या सर्व नेत्यांना महापौर निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावर एकत्रित बोलवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. सध्या नाशिक पालिकेत १२२ पैकी भाजपचे ६५ नगरसेवक आहेत. तसेच शिवसेनेचे ३४, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी ६ तर मनसेचे ५, रिपाईचा १ तर अपक्षचे ३ नगरसेवक आहेत.

सध्या राज्यात महाशिवआघाडी हे नवे समीकरण जुळून येण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुले राज्यातील सेना-भाजपची युती ही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भाजपचे नगरसेवक जर शिवसेनेत गेले तर सेनेचा महापौर विराजमान होईल, याची खबरदारी घेत भाजपचे हे पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये महापौरपदाची निवडणूक येत्या २२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या नगरसचिवांनी विभागीय आयुक्त राजाराम माने यांना सादर केला होता. तो विभागीय आयुक्तांनी मंजूर केला असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यानंतर आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या. महापालिकेत भाजपाला अगदी स्पष्ट बहुमत आहे. यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला कोणतीही अडचण नाही, असे म्हटले जात आहे.

पक्षीय बलाबल असे

भाजप- ६५
शिवसेना-३४
राष्ट्रवादी काँग्रेस- ६
काँग्रेस- ६
मनसे-५
रिपाइं- १
अपक्ष- ३
सध्या १२० नगरसेवक संख्या
सत्तेसाठी ६१ ही मॅजिक फिगर लागणार

- Advertisement -

हेही वाचा –

#पुन्हानिवडणूक? वादावर सिद्धार्थ जाधवने दिलं स्पष्टीकरण; म्हणाला…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -