घरमहाराष्ट्रपरिक्षा देण्यासाठी आलेल्या मुलाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

परिक्षा देण्यासाठी आलेल्या मुलाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Subscribe

परीक्षा देण्यासाठी आलेल्या आरोपी नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

परीक्षा देण्यासाठी आलेल्या आरोपी नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित १८ वर्षीय आरोपी फरार झाला असून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. पीडित मुलीच्या आईने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

घटनेनंतर आरोपी फरार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१८ वर्षीय आरोपी प्रताप हा सोलापूर येथे राहण्यास असून तो फिर्यादी यांचा नातेवाईक आहे. पिंपरी-चिंचवड शहरात त्याची परीक्षा होती. यासाठी तो फिर्यादी यांच्या घरी आला होता. दरम्यान, गुरुवारी पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने दुपारी बाराच्या सुमारास दरवाज्याची आतून कडी लावत १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. घटनेचे गांभीर्य ओळखून तो सोलापूर येथे फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आई घरी आल्यानंतर अल्पवयीन मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठत आरोपी नातेवाईक विरोधात फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोगम हे करत आहेत. अद्याप आरोपी प्रतापला अटक झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -