घरमहाराष्ट्र२३ लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द

२३ लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द

Subscribe

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेनेही पुढाकार घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने एकूण २३ लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हा निर्णय घेतला. महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेले ४१ रुग्ण आहेत. तसेच ही संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. सर्वाधिक गर्दी ही रेल्वेतून होत असल्याने रेल्वेने याविषयी प्रतिबंधात्मक निर्णय घेतला.

रद्द करण्यात आलेल्या एक्स्प्रेसः ११००७ मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस १९ ते ३१ मार्च; ११००८ पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च; ११२०१ एलटीटी-अजनी एक्स्प्रेस २३ ते ३० मार्च; ११२०२ अजनी एलटीटी एक्स्प्रेस २० ते २७ मार्च; ११२०५ एलटीटी-निझामाबाद एक्स्प्रेस २१ ते २८ मार्च; ११२०६ निझामाबाद-एलटीटी एक्स्प्रेस २२ ते २९ मार्च; २२१३५/२२१३६ नागपूर रेवा एक्स्प्रेस २५ मार्च; ११४०१ मुंबई नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस २३ मार्च ते १ एप्रिल; ११४०२ नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस २२ ते ३१ मार्च; ११४१७ पुणे नागपूर एक्स्प्रेस २६ मार्च ते २ एप्रिल; ११४१८ नागपूर पुणे एक्स्प्रेस २० ते २७ मार्च; २२१३९ पुणे अजनी एक्स्प्रेस २१ ते २८ मार्च; २२१४० अजनी पुणे एक्स्प्रेस २२ ते २९ मार्च; १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च; १२१२५ मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च; १२१२६ पुणे मुंबई प्रगती एक्स्प्रेस १९ मार्च ते १ एप्रिल; २२१११ भुसावळ नागपूर एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च; २२११२ नागपूर भुसावळ एक्स्प्रेस १९ ते ३० मार्च; ११३०७ /११३०८ कलबुर्गी सिकंदराबाद एक्स्प्रेस १८ ते ३१ मार्च; १२२६२ हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस २४ ते ३१ मार्च; १२२६१ मुंबई हावडा दुरांतो एक्स्प्रेस २५ मार्च ते १ एप्रिल; २२२२१ सीएसएमटी-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस २०, २३, २७ आणि ३० मार्च; २२२२२ निझामुद्दीन सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस २१, २४, २६ आणि ३१ मार्च.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -