सरकारला लाज वाटली पाहिजे – छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन रॅलीमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातल्या भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. जळगावच्या चोपडामध्ये परिवर्तन रॅलीची सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

Jalgaon
Chhagan Bhujbal
छगन भुजबळ

‘सरकारविरोधात आवाज उठवला तर सरकार तोंड दाबण्याचे काम करत असून ‘तुमचा दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी करू’, अशा धमक्या देण्याचे काम यांच्या विचारांचे लोक करत’, असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी चोपडा येथे सांगितले. तसेच, ‘मेळघाटमध्ये कुपोषणामुळे लहान मुलं दगावत आहेत. सरकारला याची लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज सघ्या जळगावात आहेत. त्या रॅलीदरम्यान चोपडामध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे.

‘राज्याला पाणी नाही, सरकार गुजरातला पाणी देतंय’

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ‘शेतकऱ्यांवर, विद्यार्थ्यांवर, महिलांवर, दलितांवर, अल्पसंख्याकांवर अन्याय करणाऱ्या या सरकारला घालवण्यासाठी हे परिवर्तन आंदोलन आहे. पाण्यासाठी आज महाराष्ट्र तडफडत आहे. मात्र सरकार पाणी गुजरातला देण्याचा करार करत आहे. मेळघाटात पाचशेच्या वर लहान मुले दगावली आहेत. सरकारला याची लाज वाटली पाहिजे,’ अशी खरमरीत टीका छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना केली. ‘युतीचे सरकार आतापर्यंत अच्छे दिन-अच्छे दिन करत होते. आता बचे कितने दिन? असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे’, असा टोला देखील त्यांनी यावेळी बोलताना लगावला.


हेही वाचा – युती सरकारला गाडून टाका – छगन भुजबळ

धरण प्रकल्पांवरून केले सवाल

दरम्यान, जळगावमधल्या अपुऱ्या धरण प्रकल्पांवरून देखील छगन भुजबळांनी सरकारवर निशाणा साधला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात निम्म, तापी, पाडळसे धरण या प्रकल्पांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. पण अजूनही हे प्रकल्प पूर्ण झालेले नाहीत. तुमच्याकडे मंत्रीपद असताना, सर्व अधिकार असताना अजून प्रकल्प का पूर्ण केला नाही?’ असा सवाल त्यांनी गिरीश महाजन यांना केला. ‘या सरकारविरोधात आवाज उठवला तर सरकार तोंड दाबण्याचे काम करते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी करू अशा धमक्या देण्याचे काम यांच्या विचारांचे लोक करत आहेत. विचारवंतांच्या हत्येबाबत सीबीआयवर हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. सीबीआय तपास करण्यात कमी पडली आहे. हे प्रकरण जाणीवपूर्वक लपवण्याचे काम यांनी केले आहे’, असं देखील छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळांचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला आणि भुजबळ अस्वस्थ झाले.

पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजला आणि भुजबळ अस्वस्थ झाले | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, January 18, 2019

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here