घरमहाराष्ट्रजाणत्या राजाला बंद पडलेले भाड्याचे इंजिन मिळाले

जाणत्या राजाला बंद पडलेले भाड्याचे इंजिन मिळाले

Subscribe

पवार नावाच्या जाणत्या राज्याला आता बंद असलेले रेल्वेचे इंजिन भाड्याने मिळते. ते कितीही प्रयत्न केले तरी आता चालत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आता पराभूत मानसिकतेचा पक्ष झाला असून या निवडणुकीनंतर तो दिसणारच नाही. या राष्ट्रीय अस्मितेच्या निवडणुकीनंतर फक्त आणि फक्त मोदींचे नेतृत्वच देशाने मोठ्या विश्वासाने उभे केल्याचे दिसून येईल असे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथील प्रचार सभेत केले. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली.

महाआघाडीचे खिचडी असलेले नेतृत्व आणि निर्णय शून्य राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला देशद्रोह काय असतो हे माहीत नाही. सातारा जिल्ह्यातील अनेक सैनिक जम्मू-काश्मीर सीमेवर काम करताना अतिरेकी मारत असताना यांना देशद्रोही कोण हे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींना शिव्या देणे हा धंदाच आहे. ३४ हजार कोटी लोकांना त्यांच्या योजनांचा थेट खात्यात पैसे मिळून फायदा झाला. आम्ही भ्रष्ट बाबूगिरी आणि दुराचार्‍यांचे सरकार संपवले. साखर कारखान्यांचे, शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविले.

- Advertisement -

मात्र, पवारांनी कृषी मंत्री असताना साखर कारखानदारांचे, इथेनॉलचे निर्णय न घेता दाबून ठेवले. सातारा जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, शहरातील पालिकेच्या प्रकल्पांना निधी दिला. उदयनराजे तुम्ही तुमच्या सरकारच्या दहा वर्षात कोणताही निधी आणला नाही तो आम्हीच दिला हे तुमच्या नेत्यांना खरे खरे सांगा. आता राजेशाही राहू द्या सर्व सामान्यांचा उमेदवार नरेंद्र पाटील यांनाच विजयी करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -