घरमहाराष्ट्रमोदींच्या बायोपिकवर बंदीची मागणी

मोदींच्या बायोपिकवर बंदीची मागणी

Subscribe

लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची तारीख जाहीर झाली आहे. एन मतदानाच्या काळात हे बायोपिक प्रदर्शित होणार असल्यामुळे या बायोपिकला बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकींच्या तारखांची काही दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख अखेरीस जाहीर करण्यात आली आहे. १२ एप्रिला रोजी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेत हा चित्रपट एक नाही तर २३ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट असणार आहे. मात्र, एकीकडे ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे, तर दुसरीकडे गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकवर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आगोयाकडे केली आहे. या चित्रपटावर निवडणुकीच्या काळात बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहीती ‘द रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीकडून मिळाली आहे.

भाजपचा छुपा अजेंडा

गेल्या आठवड्यातच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे या तारखांमध्ये मतदान होणार आहे. तसेच या मतदानाच्या दरम्यान म्हणजेच १२ एप्रिला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘द नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयूआय) या विद्यार्थी सेनेने निवडणुकीच्या काळाच चित्रपट प्रदर्शितकरून मत मिळवण्याच्या छुप्या अजेंडा राबवण्यात येणार असल्याचा आरोप भाजप पक्षावर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मतदार संघातून निवडणूक लढवतील त्या राज्यात ‘पीएम नरेंद्र मोदी’ हे बायोपिक प्रदर्शित करू नये, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

या बायोपिक विषयी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमांग कुमार यांनी केले आहे. या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉय या अभिनेत्यानी साकारली आहे. दिग्दर्शक ओमांग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’, ‘भूमी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे अनावरण १८ मार्चला दिल्लीत होणार आहे. तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते पोस्टर अनावणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -