सावंतवाडीमध्ये दिव्यांगांसाठी ‘डे केअर सेंटर’!

सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडीमध्ये लवकरच 'डे केअर सेंटर' उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Mumbai
Handicap
दिव्यांगांसाठी डे केअर सेंटर (सौजन्य-दैनिक प्रभात)

साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, आरंभ फाऊंडेशन नवी मुंबई आणि दिव्यांग पालक कमिटी सावंतवाडी यांच्यावतीने सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला दिव्यांग आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सावंतवाडीमध्ये लवकरच ‘डे केअर सेंटर’ उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन सावंतवाडीचे तहसीलदार दत्तात्रय म्हात्रे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यशाळेला दिव्यांग आणि पालकांची उपस्थिती 

समाजात दिव्यांगांचे प्रमाण वाढले आहे. या दिव्यांगांना गरज आहे, ती समाजात वेगळं स्थान निर्माण करण्याची. अश्या दिव्यागांना एकत्र आणून त्यांना शासकीय योजनांचा तसेच आरोग्यविषयक, शिक्षण विषयक तसेच स्पर्धा विषयक ज्ञान, वैद्यकिय उपचार असे उपक्रम या संस्थांनी हाती घेतले आहेत. त्याची माहिती यावेळी देण्यात आली. या संस्थांच्या पुढाकाराने आणि दात्यांच्या सहकार्यामुळे सावंतवाडीत ‘डे केयर सेंटर’ उभारले जात आहे. त्यामुळे सावंतवाडी तसेच जिल्ह्यातील दिव्यागांना एक जगण्याची उर्मी मिळणार आहे. या कार्यशाळेला दिव्यांग आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.