घरमहाराष्ट्र'मध्यस्थी करण्याइतपत मोठा राहिलेलो नाही'; खडसेंनी व्यक्त केली खंत

‘मध्यस्थी करण्याइतपत मोठा राहिलेलो नाही’; खडसेंनी व्यक्त केली खंत

Subscribe

विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारीचे तिकीट नाकारले आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना दिले. मात्र, त्यांचा या निवडणुकीत जवळपास २ हजार मतांच्या फरकावर पराभव झाला. या पराभवामुळे खडसे नाराज झाले आहेत.

‘शिवसेना आणि भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतपत मी मोठा राहिलेलो नाही’, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. खडसे बुधवारी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला गेले होते. यावेळी काही पत्रकारांनी त्यांना गाठले आणि सध्या सुरु असलेल्या सेना आणि भाजपच्या तणावासंदर्भात प्रश्न विचारले. त्यावर आपण शिवसेना आणि भाजपमध्ये मध्यस्थी करण्याइतपत मोठे नसल्याचे खडसेंनी बोलून दाखवले. विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारीचे तिकीट नाकारले आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना दिले. मात्र, त्यांचा या निवडणुकीत जवळपास २ हजार मतांच्या फरकावर पराभव झाला. या पराभवामुळे खडसे नाराज झाले आहेत. दरम्यान, निवडणुकीचा काहीही निकाल लागो, मी कायम शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी येतो, असे खडसे म्हणाले.


हेही वाचा – मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंची भेट; नाट्यमय घडामोडींनंतर पुन्हा युतीचे सरकार?

- Advertisement -

 

शिवसेनेची भूमिका स्वाभाविक – खडसे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तेरा दिवस होत आले, मात्र अध्यापही महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेली नाही. निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप पक्षाने युती जाहीर केली होती आणि त्यानुसार दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी जागा वाटपही केले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे युतीच्या सत्तास्थापनात तिढा निर्माण झाला. याबाबत खडसेंना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, ‘दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काय ठरले याची मला कल्पना नाही. त्यामुळे यावर मी फारसे भाष्य करु शकत नाही. मात्र शिवसेनेची भूमिका स्वाभाविक असून दोन्ही पक्षांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हायला हवे.’ त्याचबरोबर राज्यात युतीचेच सरकार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – १०५ आकडा ज्यांचा आहे त्यांनी सरकार बनवावे; राऊत यांची गुगली


भाजप बॅकफूटवर आली नाही – खडसे

दरम्यान, ‘भाजप बॅकफूटवर आलेली नाही. दोन्ही पक्षांमधील तणाव वाढू नये म्हणून भाजपकडून शांतपणे चर्चा सुरु आहे. युतीचे सरकार स्थापन व्हावे आणि युती तुटू नये, या विचाराने भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत’,  असे एकनाथ खडसे म्हणाले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -