घरमहाराष्ट्रलोकसभा निवडणुकीत पक्ष स्वतंत्र लढेल - नारायण राणे

लोकसभा निवडणुकीत पक्ष स्वतंत्र लढेल – नारायण राणे

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत राणे यांचा पक्ष स्वतंत्र पद्धतीने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आगामी लोकसभेमध्ये भाजप-शिवसेनेच्या युतीवर शिक्का मोर्तब झाले आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले असून राजकीय पक्षांचा कल युती बनवण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि मनसे असे समिकरण येत्या काळात बघायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निवडणुकीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राणे यांचा पक्ष आगामी निवडणूक स्वातंत्रपणे लढवेल असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राणे यांचा मोठा मुलगा निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून उमेदवार म्हणून उभे राहणार आहे. त्यांच्या या निर्णयानंतर येत्या काळात स्वाभिमान पक्ष कोणाबरोबर युती करेल यावर प्रश्न उठवला जात आहे.

काय म्हणलेत राणे

“आगामी लोकसभा निवडणूकीत आम्ही राष्ट्रवादी किंवा भाजप सोबत नाही. २०१९ ची निवडणूक आम्ही पूर्ण स्वतंत्रपणे आणि प्रामाणिकपणे लढवणार आहोत.” – नारायण राण. राणे यांचा पक्ष महाराष्ट्रातील ४८ जागांवरून निवडणूक लढवणार नाही. यापैकी काही जागांवरूनच निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -