घरमहाराष्ट्रसरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ३६ हजार पदांची 'मेगा'भरती!

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ३६ हजार पदांची ‘मेगा’भरती!

Subscribe

सरकारी नोकरी कुणाला नको असते. पण सरकारने कित्येक वर्षांपासून भरती बंद ठेवली होती. मात्र आता राज्य सरकारमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे. तसेच ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागांमधील रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनातील ३६ हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली आहे.

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रशासनातील विविध विभागांच्या एकूण ७२ हजार रिक्त जागा दोन टप्प्यात भरण्यात येतील, असे जाहीर करुन यंदा पहिल्या टप्प्यात ३६ हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी ३६ हजार पदभरती करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. या जागा भरताना ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषत: कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित विविध विभागांतील रिक्त पदे अग्रक्रमाने भरण्यात येतील.

- Advertisement -

या विभागात भरती होईल

ग्रामविकास – ११ हजार ५

सार्वजनिक आरोग्य विभाग – १० हजार ५६८

- Advertisement -

गृह विभाग – ७ हजार १११

कृषी विभाग – २ हजार ५७२

पशुसंवर्धन विभाग – १ हजार ४७

सार्वजनिक बांधकाम विभाग – ८३७

जलसंपदा विभाग – ८२७

जलसंधारण विभाग – ४२३

मत्स्यव्यवसाय विकास विभाग – ९०

नगरविकास विभाग – १ हजार ६६४

शासनाच्या या निर्णयामुळे युवकांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने विविध योजना, अभियान आणि उपक्रम आखले आहेत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. रिक्त पदामुळे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रतिकूल परिणाम होत होता. तसेच ग्रामीण भागातील विविध पायाभूत आणि जीवनावश्यक सुविधा देण्यातही अडचणी येत असल्याने कृषी आणि ग्रामविकासाशी संबंधित रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -