सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कष्टकऱ्यांचा सन्मान

बल्लारपूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात घेतलेल्या पुढाकाराची नोंद निश्चित घेतली जाईल, सुंदर शहरांच्या यादीत आपल्या छोट्या शहरांचे नाव नक्की येईल, अशा शुभेच्छा सोनु सूद यांनी बल्लारपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात दिल्या.

Maharashtra
Finance Minister Sudhir Mungantiwar
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर नगरपरिषदेने स्वच्छता अभियानात घेतलेल्या पुढाकाराची नोंद निश्चित घेतली जाईल, सुंदर शहरांच्या यादीत आपल्या छोट्या शहरांचे नाव नक्की येईल, अशा शुभेच्छा सोनु सूद यांनी बल्लारपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात दिल्या. बल्लारपूर नगरपरिषदेतर्फे आयोजित होममिनीस्टर या स्पर्धेच्या बक्षिस वितरणासाठी आयोजित कार्यक्रमात सिनेअभिनेते सोनु सूद बोलत होते.

पालकमंत्र्यांनी विकास कामांचा घेतला आढावा

यावेळी बोलताना सोनु सूद यांनी उपस्थित जनसमुदायाला स्वत:च्या शारीरिक क्षमतेवर अधिक भर देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. स्वत:चे आरोग्य उत्तम राहील, यासाठी व्यायाम ही सवय बनवा, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या चित्रपटाचे काही संवाद त्यांनी यावेळी सादर केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी सादर केला. यावेळी नगरपरिषद बल्लारपूरतर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण सोनु सूद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शब्बीर अली आणि जांभुळकर यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here