घरमहाराष्ट्रआदित्य या वर्षी निवडणूक लढवणार नाही - उद्धव ठाकरे

आदित्य या वर्षी निवडणूक लढवणार नाही – उद्धव ठाकरे

Subscribe

येत्या एक-दोन दिवसात शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करु, अशी घोषणा उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली

शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, या चर्चेवर स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पडदा टाकला आहे. ‘आदित्य सध्या तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही’, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आज (बुधवारी) सकाळी ते पत्रकारांशी बोलत होते.

‘आदित्यवर कोणतेही बंधन घातलेले नाही’

यावेळी आदित्य ठाकरे लोकसभेची किंवा विधानसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता, ‘सध्या तरी आदित्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही’, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. ‘ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कोणतेही बंधन घातले नव्हते, त्याचप्रमाणे मीदेखील आदित्यवर कोणतही बंधन घातलेले नाही. मात्र, या निवडणुकीत तरी आदित्य सहभागी होणार नाहीत’, असेही उद्धव यांनी जाहीर केले. मात्र, ‘दुसरीकडे भविष्यात निवडणूक लढवायची की नाही? हे आदित्य आणि शिवसैनिक ठरवतील’, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘येत्या एक-दोन दिवसांत शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करु’, अशी घोषणा उध्दव ठाकरे यांनी यावेळी केली.

- Advertisement -

शरद पवारांना टोला…

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. याविषयी बोलताना… ‘त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला आणि सुजयला दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? अशी खोचक टीका पवारांनी केली होती. याच मुद्द्यावरुन ‘मी माझ्यासोबत इतरांच्या मुलांचेही लाड करतो. इतरांची मुलं मी धुणी भांडी करायला ठेवत नाही,’ अशा शब्दांत उद्धव यांनी आज पवारांना टोला हाणला. सुजय विखे पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, शिवसेना-भाजपा युतीमध्ये कोणताही दगाफटका होणार नाही असा विश्वास असल्याचंही उद्धव यांनी बोलून दाखवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -