घरमहाराष्ट्रमोबाईलमध्ये कॅमेरा बसवणाऱ्याचा खून करायचाय, राज ठाकरे उद्विग्न

मोबाईलमध्ये कॅमेरा बसवणाऱ्याचा खून करायचाय, राज ठाकरे उद्विग्न

Subscribe

मोबाईलमध्ये कॅमेरा आणणाऱ्याचा खून करायचा असे वक्त्यव्य राज ठाकरे यांनी पुण्यातील कात्रज येथील अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे उद्घाटन करताना केले आहे.

कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता असो किंवा एखादा सेलिब्रेटी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी कायमच कार्यकर्त्यांचा किंवा चाहत्यांचा त्याच्याभोवती गराडा पडल्याचे आपल्याला दिसते. मात्र, या फोटोबाजीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे वैतागले असल्याचे दिसते. त्यामुळे की काय ज्याने कोणी मोबाईलमध्ये कॅमेरा बसवण्याची कल्पना आणली असेल, त्याचा मला खून करायचा आहे, असे उपरोधिक वक्तव्य त्यांनी पुण्यात कात्रजमध्ये एका कार्यक्रमात केले. विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी राज ठाकरे रविवारी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

”एक खून माफ करा, असे मी राष्ट्रपतींना सांगणार आहे. ज्याने कोणी मोबाईलमध्ये कॅमेरा बसवलाय, त्याचा मला खून करायचा आहे.”, असे राज ठाकरे भाषणावेळी म्हणाले. कात्रज येथे अहिल्यादेवी होळकर उद्यानाचे राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तसेच पुढच्या वेळी कोणालाही न सांगता मी इकडे येईन आणि या उद्यानामध्ये काय करायचे ते आपण ठरवू, असेही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

निवडणुका आल्या की थापा मारल्या जातात 

निवडणुका जवळ आल्या की थापा मारल्या जातात. पण माझे नगरसेवक चांगलं काम करताहेत, असे सांगत राज यांनी मनसेच्या नगरसेवकांची पाठ थोपटली. मी जे बोलतो ते परखड असते. त्याला काहीतरी ठोकताळा असतो, असे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -